Headlines

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटणार? आशिष शेलार यांचं सूचक विधान | MVA MLA will cross vote for daupadi murmu in presidential election today said bjp leader ashish shelar rmm 97

[ad_1]

आज देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान घेतलं जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा मूर्मू यांना दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्याच बाजी मारतील अशी चिन्हं दिसत आहेत.

असं असलं तरी महाविकास आघाडीतील अनेक आमदार पक्षाचा आदेश झिडकारून मूर्मू यांना मतदान करतील, असं सूचक विधान भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

राष्ट्रपदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शेलार म्हणाले, “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मूर्मू यांचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातून होणाऱ्या मतदानातून आम्हाला रेकॉर्ड ब्रेक बढत मिळेल, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. पक्षबंधनं आणि पक्षमर्यादा डावलून हे सर्वपक्षीय मतदान होईल. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं आपल्याला दिसेल. महाराष्ट्रातून आम्हाला जी बढत मिळेल, तो नवीन राजकीय इतिहास असेल.”

हेही वाचा- Presidential Polls 2022 Live Updates: द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात आज लढत; संपूर्ण देशाचं लक्ष

पुढे त्यांनी सांगितलं “मला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्वच दिसत नाहीये. त्यांच्यात समन्वय असणं, हा तर खूप लांबचा विषय आहे. जे रोज तोंडावर आपटले आहेत, ते पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत देखील आमची मतं फुटणार नाहीत, असं ते म्हणाले होते. पण आज द्रौपदी मूर्मू यांचं समर्थन जनतेत एवढं आहे की, अनेकजण पक्षमर्यादा सोडून किंबहुना पक्षमर्यादा झिडकारून आमदार महोदय मूर्मू यांना मतदान करतील” असंही शेलार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *