प्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच


Rakhi Sawant House in Dubai: राखी सावंत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली राखी सावंत सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे विशेष चर्चेत आहेत. बिझनेसमन आदिल खान याला ती गेल्या काही दिवसांपासून डेट करते आहे. आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे. 

आपला boyfriend आदिलवर राखी प्रेमाचा वर्षाव करत असते आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी नेहमीच काहीतरी gift असते. तसेच आदिलही राखीला सतत काहीतरी भेटवस्तू देत असते. नुकतेच आदिलने राखीसाठी दुबईत एक आलिशान घर विकत घेतलं आहे. राखीने स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे आणि आपल्या दुबईतल्या नव्या घरासाठी ऑनलाईन टूरही तिच्या चाहत्यांसाठी तिने करून दिली आहे. 

आपल्या दुबईतील घराचा ऑनलाईन व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तूफान व्हायरल होतो आहे. त्यामुळे राखीच्या चाहत्यांचे लक्ष राखीच्या नव्या घराकडे वळले आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत राखी फार खुश दिसते आहे. तिच्या स्वप्नातले घर साक्षात पुर्ण झाले आहे. आपल्या या आलिशान फ्लॅटची झलक दाखवताना राखीने लिव्हिंग रूमपासून ते बेडरूम आणि किचनपर्यंत सर्व इंटिरिअर दाखवले आहे. 

इंटरनेटवर व्हिडिओ समोर आल्यानंतर काही नेटकऱ्यांनी राखीला टोमणे मारले आणि तिला ट्रोल केले आहे. एका यूजरने कमेंट केली की, “बॉयफ्रेंड के पैसे पर ऐश कर.” 

यापूर्वी राखीने एका मुलाखतीत सांगितले होते की, आदिल तिला त्याच्या घरांच्याना भेटण्यासाठी दुबईला घेऊन गेला होता आणि तेव्हाच त्याने तिच्या नावावर एक घरही विकत घेतले होते. राखी पुढे म्हणाली, “आदिलने दुबईत माझ्या नावावर घर विकत घेतले आहे. दुसऱ्या दिवशी, त्याने मला एक BMW कार पण भेट दिली. पण खरे सांगायचे तर त्याचे प्रेम हेच माझ्यासाठी मोठं gift आहे. आदिलचे माझ्यावर फार प्रेम आहे, तो खूप विश्वासू आहे म्हणूनच तो नेहमी माझ्यासाठी काहीतरी करतच असतो.”, अशी भावनाही राखीने व्यक्त केली. 

राखीने यापूर्वी YouTuber रितेश सिंगशी ‘लग्न’ केले होते जो बिग बॉस 15 मध्ये तिच्यासोबत सहभागी झाला होता. रितेश सिंग हा आधीच विवाहित असल्याचे कळल्यानंतर  राखी सावंत आणि रितेश सिंग त्यांचे नाते संपवले. 

कसं आहे राखीचं घर? 
राखीच्या घरातील इंटिरिअर हे रॉयल टच असणारे आहे. त्या घरात अनेक सोन्याने साजलेल्या वस्तूही आहेत. लिव्हिंगरूम तर बरीच आकर्षक आहे. Source link

Leave a Reply