प्रेम असावं तर असं… पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अजूनही ‘त्या’ आठवणीत…


मुंबई : प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनात एक खास व्यक्ती असावी… जी आपल्यावर प्रचंड प्रेम करेल… असं प्रेम फक्त नशीबवान व्यक्तींना भेटतं.. खऱ्या प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री सायरा बानो आणि अभिनेते दिलीप कुमार… दिलीप कुमार यांनी 7 जुलै 2021 साली जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सायरा बानो अद्यापही त्या दुःखातून सावरल्या नाहीत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सायरा बानो अद्यापही सावरल्या नाहीत. त्या म्हणाल्या, ‘दिलीप कुमार गेल्यानंतर माझं प्रचंड नुकसान झालं आहे. यातून मी बाहेर नाही पडू शकत.. मी सर्व काही आनंदाने करत होती.’

Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता

त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही दोघे खुश होतो. मला साहेबांसोबत घरी रहायला आवडायचं… मला फिरायला आणि पार्टी करायला बिलकूल आवडत नाही.. मला घराबाहेर नाही पडायचं.’

‘मी आताही त्यांच्या प्रतीक्षेत आहे. मला आज त्यांची गरज आहे… मी कोणासोबत बोलत नाही.. फक्त जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात आहे. आज असंख्य लोक माझी चिंता करतात…’ असं म्हणत सायरा बानो यांनी दिलीप कुमार याच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या. 

फोटो : दिलीप कुमार - सायरा बानो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी 
सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी खास आहे. सायरा बानो अगदी 12 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली. सायरा बानो यांना कायमच दिलीप कुमार यांच्याशी लग्न करायचं होतं. 

सिनेसृष्टीत पदार्पण करताच दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ज्यानंतर दोघांनी लग्न केलं. सायरा यांचा विवाह दिलीप कुमार यांच्यासोबत झाला तेव्हा त्या अवघ्या 22 वर्षांच्या होत्या. Source link

Leave a Reply