प्रविण मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर.

बार्शी / प्रतिनिधी- प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांची पीएच.डी. पदवी दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली. वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन या विषयामध्ये त्यांनी ही पदवी संपादित केली आहे. “मराठी भाषिक वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्र सदराच्या संदेशातून प्रसारित होणाऱ्या मूल्यांचा वाचकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास.” या शोधविषयाच्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली असल्याचे प्रा. तानाजी ठोंबरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

या संशोधनास डॉ.जगन्नाथ शामराव पाटील, लातूर यांचे मार्गदर्शन लाभले. हा शोधप्रबंध पूर्ण करताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिपक टिळक, वृत्तपत्रविद्या जनसंज्ञापन विभागाच्या विभागप्रमुख मा.प्रा. डॉ. गीतांजली टिळक, पीएच.डी. विभागप्रमुख डॉ.सुनंदा यादव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

झाडबुके महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी असताना देखील त्यांनी ही उच्च पदवी संपादित केल्यामुळे बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमती प्रभाताई झाडबुके, संचालिका सौ वर्षाताई झाडबुके, प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच मस्तुद यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कामगार, शेतकरी संघटनांच्या, विविध जबाबदाऱ्या सांभाळत हे यश संपादित केल्यामुळे कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे, आयटकचे कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, आई सुरेखा मस्तुद, तसेच झाडबुके महाविद्यालयातील प्रा.डॉ. सुहास कुलकर्णी व शिक्षक- शिक्षकेतर, तसेच कम्युनिस्ट, कामगार, शेतकरी, विदयार्थी, अनिस या चळवळीतील सर्व सहकारी, मित्र, आप्त यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply