Prataprao jadhav alligation on uddhav thackeray on sachin waze money laundring case spb 94दसरा मेळावा जवळ येत असताना, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

हेही वाचा – “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

काय म्हणाले प्रतापराव जाधव?

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा – दसरा मेळावा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान!

किशोरी पेडणेकरांचे जाधवांना प्रत्युत्तर

दरम्यान, “जाधवांच्या या आरोपाला शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. शिंदे गटातील आरोपांचा आता कंटाळा यायला लागला आहे. अगदी निचपणे हे आरोप सुरू आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे शोधावे लागेल. जो उठतो तो स्क्रिप्ट घेऊन बोलतो आहे. त्यामुळे यांच्या आरोपाला आम्ही काहीही उत्तर देणार नाही”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.Source link

Leave a Reply