Prakash Ambedkar Request To Yeshwant Sinha For withdraw his candidature From Presidential race Spb 94Presidential Election : विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती बहूजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हेही वाचा – “राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल”, यशवंत सिन्हा यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

यशवंत सिन्हा यांनी आपली राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो. देशातील सर्वच पक्षांतील अनुसूचित जाती, आदिवासी आणि दलित सदस्य द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हेही नाचा – “मोदीभक्त माझ्या ‘पीएचडी’शी तुलना करू शकत नाहीत”; सुब्रमण्यम स्वामी बोलले खरे, पण…

दरम्यान, १८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.Source link

Leave a Reply