प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ संपन्न


नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

या सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 26: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

000

Source link

Leave a Reply