Headlines

प्रभाकर देशमुख यांनी घेतली गूळपोळीतील आंदोलनकर्त्यांची भेट

बार्शी /प्रतिंनिधी – बार्शी (BARSHI)तालुक्यातील गुळपोळी येथे जनहित शेतकरी संघटनेचे(JANHIT SHETKARI SANGHTANA) शाखाध्यक्ष गुळपोळी विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बार्शी सहाय्यक निबंधक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागण्यासाठी शाखाध्यक्ष पायाने अपंग असणारे सूर्यकांत चिकणे (SURYAKANT CHIKANE )यांची गुळपोळी येथे विठ्ठलाच्या मंदिरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या 173 व्या  दिवसी  आंदोलन स्थळी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेतली .  

बार्शी तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांना  मोबाइलवरून संपर्क साधला तुम्ही त्यां शेतकर्‍यांवर  अन्याय करू नका शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले असताना त्यांना बोगस नोटिसा का काढल्या ? त्या शेतकऱ्यांकडे  विविध कार्यकारी सोसायटी गुळपोळी (GULPOLI)चे नीलचे दाखले आहेत . पुराव्यासहित तुम्ही संबंधितांची आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांना आयुष्यावर  मोठे होत असाल तर जनहित शेतकरी संघटना आठ दिवसानंतर आपल्या कार्याला कुलूप लावून तुम्हाला फोडून टाकीन असे आव्हान देशमुख यांनी फोनवर बोलताना केले .

इतर सर्व संवाद मोबाईल फोन मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आहे . यावेळी अपंग सूर्यकांत चिकणे  यांना लाल मुंग्या चावल्या व त्यांच्या शरीर रक्तबंबाळ झाले होते . हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देशमुख यांना अतिशय दुःख वाटले.  गेंड्याच्या कातडीच्या शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा त्यांनी निषेध केला . यावेळी बार्शीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र मुठाळ , तालुका अध्यक्ष अंकुश वाघमारे , संपर्कप्रमुख संदीप गोटे , बिलाल पठाण , अजिज भाई शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *