पोटच्या मुलीसोबत Lip Lock, अनेक अभिनेत्रींसोबत इंटिमेट फोटो… दिग्दर्शकाचं वादग्रस्त आयुष्य


मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून आज महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची ओळख आहे. महेश भट्ट त्यांच्या कामामुळे नाही तर, अनेकदा वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत असते.  महेश भट्ट यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. चित्रपटांव्यतिरिक्त अनेक वादही त्यांच्या आयुष्याशी संबंधित आहेत. आज महेश भट्ट वाढदिवस साजरा करत आहे. 20 सप्टेंबर 1948 रोजी जन्मलेले महेश भट्ट आज 74 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने जाणून घ्या महेश भट्ट यांच्या आयुष्याशी संबंधित काही वाद आणि प्रसिद्ध किस्से. (Mahesh Bhatt personal life)

वेगवेगळ्या धर्माचे आई-वडील
महेश भट्ट यांची आई मुस्लिम आणि वडील हिंदू होते. यामुळेच इतर विवाहित जोडप्याला समाजात मान्यता मिळते तशी दोघांच्या लग्नाला मिळाली नाही. अशा परिस्थितीत महेश यांना आईनेच वाढवलं. कदाचित यामुळेच त्यांनी आयुष्यातही लग्नाला फारसे महत्त्व दिले नाही. (mahesh bhatt married life)

मुलगी पुजा भट्टसोबत महेश यांचे लिप लॉक सिन (Mahesh’s lip lock scene with daughter Pooja Bhatt)
एका मासिकासाठी महेश आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांनी बोल्ड (lip lock) फोटोशूट केलं. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पूजाच्या सौंदर्यावर महेश भट्ट इतके भाळले की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती. मुलीच्या सौंदर्याची अशी प्रशंसा करत भट्ट यांनी जणू सर्वांना हादरा दिला होता. 

आपल्या या वक्तव्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात रोषाचा सामना करावा लागला होता. ते नैराश्यात गेले होते. अखेर त्यांनी सर्वांती क्षमा मागितली, तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झालं.  (Mahesh bhatt gets intimate photo with many actress)

परवीन बाबी आणि महेश भट्ट यांचं नातं
दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत परवीन रिलेशनशिपमध्ये होत्या. तीन वर्षे त्यांचं हे नातं चाललं. तेव्हा महेश विवाहित होते. परवीन बाबी भट्ट यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. पण, मद्यपान, सिगरेट आणि वाईट सवयींमुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं. 

सिजोफ्रेनिया नामक आजारानं त्यांना गाठलं. हा एक अनुवांशिक आजार होता. ज्याचे उपचार अशक्य होते. परवीन यांना मधुमेह आणि गँगरिनही झालं. आजारपणामुळं महेश भट्ट यांनी परवीन यांची साथ सोडली. 

रिया चक्रवर्तीसोबत महेश भट्ट यांचा फोटो (Photo of Mahesh Bhatt with Rhea Chakraborty)
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव चांगलेच चर्चेत आलं. दरम्यान, जिया खान (jia khan) आणि रियाचे महेश भट्टसोबतचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमुळे देखील महेश भट्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले. Source link

Leave a Reply