Headlines

कोवीड 19 गेम चेंजर या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय झाली पोस्टर स्पर्धा

 

बार्शी/प्रतिनिधी – श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शीच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने’ कॉव्हिड 19, द गेम चेंजर’ या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. 


महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी काढलेल्या 50 पेक्षा जास्त पोस्टर्सचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही यात भाग घेतला आणि 18 पेक्षा जास्त पोस्टर नोंदवला.


या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन झा आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रो. डॉ. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायलॉस्ट सोसायटी, इंडिया  यांच्या हस्ते झाले.

 त्यांनी कोरोनावरील अतिशय माहितीपर व्याख्यान दिले.


प्रथम स्नेहा नलवडे,  द्वितीय स्वेता जाधव, तृतीय भूमिती माने व विशाखा शिराळकर या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार करण्यात आला.  यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्षा मा. सौ. वर्षाताई झाडबुके यांनी अभिनंदन केले.


या कार्यक्रमाचे आयोजन एसबीझेडएम, मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख श्रीमती अरुषा नंदीमठ यांनी केले होते. डॉ. नमिता डोईफोडे आणि श्री. प्रवीण मस्तुद यांनी सहकार्य केले.

 प्राचार्य डॉ.एच.एस.पाटील सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले व उपस्थितांचे कौतूक  केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *