लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूचे गूढ वाढले, कुटुंबियांचे बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप


मुंबई : बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत चालले आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पल्लवीचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निक चक्रवर्तीवर हत्येचा आरोप केला आहे. पल्लवीचा मृतदेह रविवारी कोलकात्याच्या गरफा भागात तिच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या फ्लॅटमध्ये पल्लवी साग्निकसोबत राहायची. पल्लवीच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, साग्निक विवाहित आहे. ही गोष्ट त्याने पल्लवीपासून लपवून ठेवली होती. त्याचे अनेक महिलांशी संबंधही आहेत. नुकतेच त्याचे पल्लवीच्या एका मैत्रिणीसोबतही अफेअर होते. पल्लवीला हे सहन होत नव्हते. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. त्यामुळेच त्याने पल्लवीचा जीव घेतला.

पल्लवीच्या पैशांवर साग्निकचाही डोळा होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. दोघांकडे 15 लाखांची मुदत ठेव असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील सर्व पैसे पल्लवीचे होते.

Bengali actress Pallavi Dey commit suicide in kolkata plrh | Pallavi Dey:  20 साल की इस एक्ट्रेस ने की आत्महत्या, पंखे से लटका मिला शव | Hindi News,  Zee PHH Entertainment

विशेष म्हणजे पोलीस साग्निकची चौकशी करत आहेत. पल्लवी आणि त्याचा मोबाईल जप्त करण्यात आलाय. पोलीस पल्लवीचे व्हॉट्सअॅप आणि फोन कॉल्स ट्रेस करून तिच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस मुख्यत्वे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की पल्लवीचे शेवटचे बोलणे कोणासोबत होते? तिला साग्निकचे काही टेन्शन होते का? पल्लवीने साग्निक यांच्या उपस्थितीत असे पाऊल का उचलले?

TV Actress Pallavi Dey Death: খুন নাকি আত্মহত্যা! পল্লবীর ময়নাতদন্তের  প্রাথমিক রিপোর্টে কীসের ইঙ্গিত?/ TV Actress Pallavi Dey Death Anti mortem  hanging, No foul play could be detected in ...

‘रेशम जापी’ या बंगाली मालिकेने पल्लवी घरोघरी लोकप्रिय झाली. यानंतर तिने ‘आमी सिराजेर बेगम’ या मालिकेत काम केले. पल्लवी ही मूळची हावडा येथील संत्रागाछी भागातील आहे.Source link

Leave a Reply