Headlines

उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्या हस्ते यशोदा पार्क येथे वृक्षारोपण

बार्शी/प्रतिनिधी – आज यशोदा पार्क(कासारवाडी रोड)येथे वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बार्शी नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष मा.कृष्णराज तथा नानासाहेब बारबोले यांच्या प्रमुख उपस्थित सुमारे ७० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मा.नानासाहेब बारबोले यांनी,यशोदा पार्क मित्रमंडळाचे वतीने या परिसरात नेहमीच होत असलेल्या विविध सामुदायिक कामाचे कौतुक करीत.या परिसरातील समस्यांबाबत वेळोवेळी मदत करण्याचे आश्वस्त केले. याझाडांच्या वाढीसाठी व संगोपनासाठी यापुढील काळात योग्य ते सहकार्य करण्याचे अभिवचन वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फाऊंडेशनचे प्रतिनिधी मा.तुळशीदासभाऊ मस्के यांनी दिले.

हे ही वाचा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे खजिनदार मा.वाघमारे सर यांनी केले.यानिमित्ताने उपनगराध्यक्ष मा.नानासाहेब बारबोले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान मंडळाचे अध्यक्ष मा.विनोद गायकवाड यांनी केला तर वृक्षसंवर्धन समितीचे मा.तुळशीदासभाऊ मस्के यांचेसह त्यांच्या सर्व टीमचा पुष्पगुच्छ देवून सन्मान मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक मा.लक्ष्मणतात्या लवळे व मा.अप्पा कडगंची यांनी केला,वृक्षरोपनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशोदा पार्क मित्रमंडळाचे सचिव मा.धनंजय काळे सर यांचेसह मंडळाचे क्रियाशील सदस्य मा.विशालजी नलवडे साहेब,मा प्रा.शंकर अंकुश सर,मा.मच्छिंद्र पवार सर,मा.रणजित दराडे साहेब,मा.किरण लांडे सर,मा.श्रीकांत ढेरे,मा.सुहास लवळे,मा.नितीन कवडे,मा.सचिन पवार,मा.विजयजी कांबळे साहेब,मा.धर्मा पाटोळे,चि.आदित्य गायकवाड,चि.श्लोक अंकुश,चि.रुद्र पाटोळे,चि.कृष्णा वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *