फोटोत गोड हसणारा मुलगा आज बॉलिवूडचा स्टार, ओळखणंही झालं कठीण?


मुंबई : बॉलिवूड कलाकार आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अनेकदा लहानपणीचे फोटो पाहून या कलाकारांना ओळखणं कठीण होऊ जातं. फोटोत दिसणारा हा गोड मुलगा आज बॉलिवूडमधील मोठा स्टार आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत मुलगा अतिशय गोड हसताना दिसत आहे. 

आजही या अभिनेत्याची स्माईल तितकीच गोड आहे. आपल्या अभिनेत्यासोबतच त्याने आपल्या लूकने प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. हा मुलगा या फोटोत आणि प्रत्यक्षातही खूप गोड आणि हँडसम दिसत आहे. 

या अभिनेत्याचा प्रत्येक सिनेमा वेगळा आहे. सिनेमातील भूमिकेला न्याय देण्याचा त्याचा स्वभाव प्रेक्षकांचं मन जिंकतो. 

तुम्ही आता या अभिनेत्याला ओळखले असेल. आणि अजूनही त्यांना ओळखायला जमले नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो की, हा फोटो अभिनेता आयुष्मान खुरानाचा आहे.

आयुष्मान खुराना हा एक भारतीय टेलिव्हिजन अँकर तसेच चित्रपट अभिनेता आणि गायक आहे. अभिनयासोबतच त्यांनी भारतीय टेलिव्हिजनमध्ये अँकरिंगही केले आहे. टीव्ही असो वा चित्रपट, सर्वत्र लोकप्रिय आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर आयुष्मान खुरानाचा जन्म चंदीगडचा. त्याचे वडील पी. खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत आणि त्याची आई गृहिणी आहे.

आयुष्मानचे शालेय शिक्षण सेंट जॉन हायस्कूल आणि डीएव्ही कॉलेज, चंदीगडमधून झाले. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला आणि पुढील शिक्षण पंजाब विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्युनिकेशन स्टडीजमधून केले.

त्याने त्याची बालपणीची मैत्रिण ताहिरा खानशी लग्न केले आहे. या दोघांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव विराजवीर, मुलीचे नाव वरुष्का आहे. Source link

Leave a Reply