Headlines

Photos : हा ‘थाय मसाज’ डोकं भणभणून सोडेल; आजोबांना तिथे पाहून सगळेच चक्रावले

[ad_1]

मुंबई : काही शब्दांबद्दल समाजात म्हणा किंवा आणखी कुठे म्हणा न्यूनंगड किंवा काही चुकीचे समज बळावतात आणि मग त्या शब्द किंवा त्या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. असाच एक शब्द, जो नुसता उच्चारला तरीही तो ऐकून अनेकांचेच कान टवकारतात. 

हा शब्द आहे ‘थाय मसाज’. सोशल मीडियावर कुतूहलाचा भाग म्हणून या शब्दाला अनुसरून अनेकदा बऱ्याच गोष्टी शोधल्या जातात. याच गोष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (thai massage )

आता थाय मसाजचे फोटो, म्हटलं की एक मुद्दा आलाच… हा मुद्दा म्हणजे हे फोटो कसे असतील? काही वेडंवाकडं तर नसेल त्यात? तर, नाही. सध्या सोशल मीडियावर थाय मसाजचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. 

फक्त एक आजोबा आहेत, ज्यांच्याभोवती असणारा सौंदर्यवतींचा गराडा दिसत आहे. ज्यामुळं मात्र तुम्हालाही धक्का बसेल. (thai massage photos)

‘थाय मसाज’चा हा सर्व घाट घातला गेला आहे तो म्हणजे एका चित्रपटासाठी. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटातील काही फोटो सध्या नजरा वळवत आहेत. 

उज्जैन आणि थायलंड येथे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. तर, अभिनेता गजराज राव यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. इम्तियाजचे चित्रपट म्हटलं, की त्यामध्ये ओघाओघानं प्रवास आणि त्यामध्ये घडणारे अफलातून प्रसंग आलेच. तेव्हा आता या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं इम्तियाज नेमका हा विषय कसा हाताळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *