बाबा निरालाची बायको सौंदर्याची खाण; भल्या-भल्या अभिनेत्रींना देते टक्कर… पाहा फोटो


मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल अनेकदा पत्नी तान्या देओलसोबत दिसतो. त्याची पत्नी तान्या सौंदर्यात कोणत्याहीअभिनेत्रीपेक्षा कमी नाही. जेव्हा-जेव्हा तान्या देओलचा फोटो सोशल मीडियावर समोर येतो तेव्हा-तेव्हा चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करतात. तान्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिच्या फॅन पेजवर इन्स्टाग्रामवर सतत फोटो शेअर केले जातात.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमबॅक केले आहे. अशा परिस्थितीत बॉबी देओलच्या प्रोफेशन आयुष्यासोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यही प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे.

बराच काळ फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर बॉबीने ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेबसीरिजमधून दमदार कमबॅक केलं आहे. दोन्हीमध्ये बॉबी देओलने आपल्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. आता आम्ही बॉबी देओलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. आज बॉबी देओलच्या पत्नीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसा निमत्त त्याने तिच्यासाठी खास पोस्टही शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉबी देओलने ३० मे १९९६ रोजी तान्या आहुजासोबत लग्न केलें. बॉबी आणि तान्याचं लव्हमॅरेज आहे. हे लग्न कसं झालं या मागेही एक रंगतदार कथा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा बॉबी देओल आपल्या मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. त्यावेळी त्याची नजर तान्यावर पडली.  बॉबी देओल तान्याच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला होता.

तान्याला पाहताच बॉबी तिच्या प्रेमात पडला होता. मात्र, त्यावेळी त्याला ना तान्याचं नाव माहीत होतं ना बॉबीचा तिच्याशी संपर्क होता. खूप प्रयत्नांनंतर, बॉबीला कसा तरी तान्याचा नंबर मिळवण्यात यश आलं, मात्र तिने त्याला भेटण्यास नकार दिला. मात्र बऱ्याच वेळानंतर, तान्या त्याला भेटण्यास सहमत झाली आणि त्यांची भेट लवकरच प्रेमात बदलली. बातमीनुसार, तान्याला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी बॉबी तिला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला होता जिथे त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. बॉबीने लग्नासाठी प्रपोज करताच तान्याने लगेच होकार दिला.

 बॉलीवूडचा अभिनेता बॉबी देओल (Bobby deol) याने 1995 मध्ये ‘बरसात’ सिनेमातून पदार्पण केले होते. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात तो अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle khanna) सोबत दिसला होता. तरुणांमध्ये बॉबी देओलच्या लांब केसांची आणि सनग्लासेसची क्रेझ दिसत होती. मधल्या काळात त्याचे काही सिनेमे फ्लॉप ठरले. त्याचे सिनेमे येणं बंद झालं. पण आता तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या बॉबी देओल ओटीटीवर दिसत आहे. बॉबी देओलच्या आश्रम या वेब सिरीज चागंलीच चर्चा होती. यामध्ये त्याने बाबा निराला हे पात्र साकारलं. जे चांगलच गाजलं.Source link

Leave a Reply