Headlines

फोनची ट्रिंग-ट्रिंग ऐकून कंटाळलात? तुमच्या आवडीचं गाणं मोफत कॉलर म्हणून ट्यून सेट करा

[ad_1]

नवी दिल्ली : How To Set Airtel Caller Tune for Free : हॅलोट्युन्सचा काळ कधी जुना होणार नाही. परंतु आजही असे लाखो लोक आहेत जे हॅलोट्युन्स शिवाय फोन वापरत आहेत. अनेकांना वाटतं की यासाठी पैसे खर्च करणं योग्य नाही. परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे की, एअरटेल ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना हॅलोट्युन्सची सेवा मोफत देत आहे. मोफत हॅलोट्युन्स सेट करण्यासाठी तुम्हाला केवळ Wynk Music अ‍ॅपची गरज आहे. हे अ‍ॅप आयओएस आणि अँड्रॉयड दोन्हीसाठी उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही गाण हॅलो ट्युन (कॉलर ट्युन) म्हणून सेट करू शकता.

मोफत हॅलोट्युन किंवा कॉलर ट्युन सेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सर्वात आधी Wynk Music अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागेल. जर तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप आधीपासूनच उपलब्ध असेल तर तुम्हाला ते केवळ अपडेट करावं लागेल.

कॉलर ट्युन सेट करण्याची सोपी प्रोसेस

सर्वात आधी अ‍ॅप ओपन करा. त्यानंतर डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लि करा. त्यानंतर तुमच्यासमोर काही ऑप्शन्स ओपन होतील. तेव्हा Hello Tunes वर टॅप करा.

वाचाः स्वस्तात मस्त ‘हे’ Laptops आहेत प्रत्येक युजरसाठी परफेक्ट, किंमत २० हजारांपेक्षा कमी

त्यानंतर तुम्ही तुमचं आवडतं गाण निवडू शकता, तुमच्या आवडीचं गाणं तिथे दिसलं नाही तर सर्च करा आणि त्यानंतर सिलेक्ट करा. तिथे तुम्ही गाणं ऐकू देखील शकता. गाण्यावर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला Set as Hello Tune असा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की, Set For Hellotune For? त्याखाली दोन पर्याय असतील पहिला प्रीमियम जो Close friends साठी आहे आणि दुसरा All Callers जो सर्वांसाठी आहे. जर तुम्ही प्रीमियम पर्याय स्वीकारला तर तुम्हाला कॉलर ट्युन साठी पेमेंट करावं लागेल. जर तुम्ही All Callers हा पर्याय निवडला तर तुम्हाला ही सेवा ३० दिवसांसाठी मोफत मिळेल. या काळात तुम्ही ५ वेळा गाणं बदलू शकता.

प्रीमियम प्लॅन्सची किंमत

तुम्ही वार्षिक प्रीमियम प्लॅन खरेदी केला तर यासाठी तुम्हाला ३९९ रुपये मोजावे लागतील. तुम्ही ३ महिन्यांसाठी हा प्लॅन खरेदी केलात तर तुम्हाला १२९ रुपये मोजावे लागतील.

वाचाः ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा Realme चा हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, ७ सप्टेंबरपर्यंत ऑफर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *