Headlines

फोनचा Pattern-Pin नाही लक्षात? काळजी नको, या टिप्सने लगेच होईल स्मार्टफोन अनलॉक


नवी दिल्ली: Smartphone Pattern Lock: युजर्स फोनवरील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बरेच काही करतात . यापैकी एक म्हणजे पासवर्ड सेट करणे. फोनमध्ये पासवर्ड टाकणे. पॅटर्न पिन सेट करणे सामान्य झाले आहे. आजकाल फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक देखील ट्रेंडमध्ये आहे. पण, अनेकदा युजर्सना त्यांचा पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न लक्षात ठेवणे कठीण जाते. तसेच, चुकीच्या पद्धतीने पिन टाइप केल्यामुळे किंवा पासवर्ड विसरल्यामुळे अनेक वेळा वापरकर्त्यांचे डिव्हाइस लॉक होते. अशात फोन लॉक झाल्यावर तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या फोनचा पॅटर्न, पिन किंवा पासवर्ड विसरल्यास काय करावे, तुम्ही फोन कसा अनलॉक करू शकता ते जाणून घेऊया. यासाठी काही सोप्पी टिप्स फॉलो कराव्या लागतील.

वाचा: Reliance AGM 2022: २०१७ ते २०२१, पहिल्या जिओ फोननंतर Reliance ने दरवर्षी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

याप्रमाणे फोन अनलॉक करा:

यासाठी सर्व प्रथम फोन बंद करा आणि सुमारे एक मिनिट प्रतीक्षा करा. नंतर पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकत्र दाबा. एकदा तुम्ही रिकव्हरी मोडमध्ये आलात की फॅक्टरी रीसेट पर्याय निवडा. तुमचा सर्व डेटा क्लियर करण्यासाठी कॅशे क्लीन करा निवडा. यानंतर एक मिनिट थांबा आणि नंतर फोन चालू करा. त्यानंतर पासवर्ड न टाकता फोन ऑन होईल.

वाचा: Redmi ते OnePlus हे टॉप इअरबड्स ऑफर करतात भन्नाट साउंड क्वालिटी, पाहा किंमत

Google डिव्हाइस व्यवस्थापक वापरून फोन अनलॉक करा:

Google डिव्हाइस व्यवस्थापकवर जा. त्यानंतर तुमच्या Google खात्यात साइन इन करा. तुम्हाला अनलॉक करायचा आहे तो फोन निवडा. लॉक पर्याय निवडा. तुमचा नवीन पासवर्ड टाइप करा. लॉक वर पुन्हा क्लिक करा आणि नवीन पासवर्डसह तुमचा फोन अनलॉक करा.

वाचा: Smartphone Deals: स्वस्तात घरी न्या Samsung चा 5G स्मार्टफोन, मिळतोय जोरदार डिस्काउंट, फोनमध्ये १०८ MP कॅमेरा

Source link

Leave a Reply