Headlines

पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही | E Crop Inspection Record is not mandatory for crop insurance pune print news msr 87

[ad_1]

पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदीच्या दाखल्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट पासून सुरू –

राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र, योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीतील नोंद सक्तीची असल्याने योजनेत सहभाग घेता येत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पण, अशी कोणतीही सक्ती नाही. शेतकऱ्यांना पिकाचे स्वयंघोषणापत्र जोडून पीकविमा योजनेत सहभागी होता येईल. राज्य सरकारच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होत आहे, त्या वेळी आपल्या पिकाची नोंद करावी, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

योग्य नोंद ई-पीक पाहणीत करणे आवश्यक –

“स्वयंघोषणा पत्र देऊन पीकविमा योजनेत भाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीत आपल्या पिकाची नोंद करावयाची आहे. विम्यासाठी नोंद केलेले क्षेत्र आणि ई-पीक पाहणीतील क्षेत्रात तफावत आढळून आल्यास ई-पीक पाहणीतील क्षेत्र अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत ज्या पिकासाठी सहभाग घेतला आहे, त्याची योग्य नोंद ई-पीक पाहणीत करणे आवश्यक आहे.”, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *