Paytm वर बुक करा ट्रेनचे तिकिट, चेक करा लाईव्ह स्टेटस, या ट्रिक्स करतील मदत


नवी दिल्ली: Paytm App: पेटीएम भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट अॅप्सपैकी एक आहे. App अनेक फीचर्स प्रदान करते, जे खूप उपयोगाचे आहेत. विशेष म्हणजे, यात आता रेल्वे तिकीट बुकिंग देखील समाविष्ट झाले आहे. Paytm ने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे युजर्सना ट्रेनचे तिकीट बुक करणे, PNR स्टेटस तपासणे किंवा लाईव्ह ट्रेनचे स्टेटस तपासण्याचा पर्याय मिळेल. पेटीएम अॅपच्या पीएनआर कन्फर्मेशन प्रिडिक्शन फीचरच्या मदतीने युजर्स तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता काय आहे हे देखील तपासू शकतात.

वाचा: तुमच्या Aadhaar Card चा कधीच गैरवापर होणार नाही, फॉलो करा सोपी टिप्स, राहा सेफ

एवढेच नाही तर, प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध न झाल्यास युजर्सना गॅरेंटीड सिट असिस्टेंस व्यतिरिक्त पर्यायी मार्गांचे पर्यायही दाखवले जातील. युजर्स यापूर्वी बुक केलेल्या तिकिटांचे पीएनआर स्टेटस आणि ट्रेनचे स्टेटस देखील तपासू शकतात.

वाचा: वापरात नसलेल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा, फॉलो करा या टिप्स

ट्रेनचे तिकीट कसे बुक करावे ?

सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अॅपवर जावे लागेल किंवा paytm.com/train-tickets वेबसाइटला भेट द्यावी लागेल. सोर्स आणि डेस्टिनेशन स्थानक निवडल्यानंतर, प्रवासाचा दिवस निवडावा लागेल आणि ‘शोध’ वर टॅप केल्यानंतर उपलब्ध ट्रेन्सची यादी दिसेल. तुमच्या आवडीची ट्रेन निवडल्यानंतर, तुम्हाला सीट किंवा क्लास निवडणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या IRCTC खात्यासह लॉग इन करण्यास सांगितले जाईल. IRCTC लॉगिन केल्यानंतर प्रवासी तपशील प्रविष्ट करणे आवश्यक असेल आणि पेमेंटसाठी IRCTC वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल. पडताळणीनंतर, तुमचे तिकीट बुक केले जाईल आणि तुम्हाला ते PDF म्हणून डाउनलोड करण्याचा पर्याय देखील मिळेल.

PNR स्टेटस कसे तपासायचे ?

पेटीएम अॅप किंवा वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला ‘ट्रेन तिकीट’ विभागात क्लिक किंवा टॅप करणे आवश्यक आहे. आता पीएनआर स्टेटसवर गेल्यानंतर तुम्हाला तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. आता ‘चेक पीएनआर स्टेटस’ वर टॅप केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तिकीट स्टेटस दिसेल.

लाईव्ह ट्रेनचे स्टेटस पाहण्याचा मार्ग :

पेटीएम अॅपवर गेल्यानंतर तुम्हाला ‘ट्रेन तिकीट’ विभागात जावे लागेल. येथे तुम्हाला त्या ट्रेनचे नाव किंवा नंबर लिहावा लागेल ज्याचे लाईव्ह रनिंग स्टेटस तपासायचे आहे. आता तुम्हाला बोर्डिंग स्टेशन निवडावे लागेल. यानंतर, बोर्डिंगची तारीख टाकल्यानंतर, तुम्हाला ‘चेक लाइव्ह स्टेटस’ वर क्लिक करावे लागेल.

वाचा: अर्ध्या किमतीत मिळतोय OnePlus चा हा दमदार स्मार्टफोन, फोनचा कॅमेरा-परफॉर्मन्स जबरदस्त

Source link

Leave a Reply