पतीच्याच घरातील लिफ्टमध्ये Elon Musk सोबत अभिनेत्री इंटिमेट ; Viral Video मुळे धुमाकूळ


मुंबई :  सध्या चित्रपट वर्तुळाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. जिथे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या Elon musk यांचा एका महिलेसोबतचा इंटिमेट व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं सांगण्यात येत आहे. (johnny depp amber heard judgement)

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओमध्ये मस्क यांच्यासोबत दिसणारी ती कोण? हा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास त्याचं उत्तर काही दूर नाही. मस्क यांच्यासोबत लिफ्टमध्ये रोमान्स करणारी ‘ती’ एम्बर हर्ड असल्याचं म्हटलं जात आहे. (Hollywood Actor Johnny Depp ex wife Amber Heard had a relationship with Elon Musk lift romance video viral )

अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्या नात्याशी संबंधीत प्रत्येक लहानमोठी गोष्ट सध्या जगासमोर येत आहे. ज्यामुळं त्यांच्या नात्याचीच चर्चा सुरु आहे. 

एम्बर आणि जॉनी यांचं नातं आता अतिशय विकृत वळणावर आलं आहे, जिथे त्यांच्यातील खासगी संबंधही चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच आता आणखी एका नव्या आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीचं नावही प्रकाशात आलं आहे. 

ही व्यक्ती म्हणजे एलन मस्क. ट्विटरला खरेदी करता करता एलन मस्क यांच्या नावाची भलतीच चर्चा सध्या सुरु आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांचं एम्बरशी असणारं नातं. 

जॉनीनं एलन आणि एम्बरच्या अफेअरला वाचा फोडलेली असतानाच आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एम्बर आणि एलन जॉनी डेपच्याच पेंटहाऊसच्या लिफ्टमध्ये इंटिमेट झाल्याचं दिसत आहे. 

जॉनीपासून घटस्फोट घेतल्यानंतर एम्बर एलनच्या संपर्कात आली होती. पण, वर्षभरानंतरच एलनसोबतच्या नात्यातूनही ती दुरावली गेली होती. 2018 मध्ये हे दोघं पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आले, पण काही महिन्यांनीच त्यांच्यात दुरावा आला. 

जॉनीनं न्यायालयात दिलेल्या व्हिडीओंमध्ये एलन आणि एम्बर रात्री उशिरा भेटत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहेत. एम्बर आणि एलनचं नातं 2015 पासूनच असल्याचं म्हणत आपल्या लग्नानंतर महिन्याभरातच एलन आणि एम्बर यांच्याच जवळीक निर्माण झाल्याचा खळबळजनक आरोप जॉनीनं केला होता. 

24 अप्रैल 2017 ला एम्बरनं तिचं आणि एलनचं नातं जगासमोर आणलं होतं. तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. जिथे एलनच्या गालावर लिपस्टीकची खूणही दिसत होती. Source link

Leave a Reply