Pathaan Movie: Controversy मध्ये अडकलेल्या नंतरही Pathaan चित्रपटला प्रेक्षकांची साथ…


Pathaan Advance Booking: मागच्या महिन्यात चर्चा होती ती म्हणजे पठाण या चित्रपटाची. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या चित्रपटाला त्यामुळे अनेकांकडून विरोध होऊ लागला. या गाण्यात दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Safforn Bikini Controversy) भगव्या बिकीनीवरून बराच कल्लोळ माजला होता. दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला. त्याचबरोबर या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरही सेन्सॉरनं कात्री मारली आहे. परंतु या वादाचा पुरेपर फायदा चित्रपटाला होताना दिसतो आहे. मागच्या महिन्यात पदर्शित झालेल्या बेशरम रंग या गाण्याला युट्यूबवर (You Tube) अब्जोवधी व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचसोबत आता या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात एडव्हान्स बुकींग झाल्याचे समाेर आले आहे. (pathaan movie gets its advance booking full see the latest updates)

अभिनेता शाहरूख खानचा पठाण (Pathaan Movie Advanced Booking) हा चित्रपट बऱ्याच कालावधीच्या अंतरानं येतो आहे. हा चित्रपट लॉकडाऊनच्याही आधी येणार होता. परंतु करोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणावरून या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही पुढे लांबली गेली. या चित्रपटाची उत्सुकता शाहरूखच्या (Shahrukh Khan) चाहत्यांना लागली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार तेवढ्यातच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावरून बराच गदारोळ माजला असला तरी याचित्रपटातील नुकत्याच रिलिज झालेल्या गाण्याला अब्जो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे भगव्या बिकीनीवरून उठलेल्या वादाचा पठाणच्या चित्रपटाला भरपूर फायदा झाला. 

मध्यतंरी झालेल्या एका फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरूख खान आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर भाष्य केले होते. या वादाबद्दल एकही अवाक्षर न काढता त्यांनी पठाण चित्रपटाला होणाऱ्या वादावर भाष्य केले होते. 

एडव्हान्स बुकींग किती झाले? 

पठाण या चित्रपटानं आत्तापर्यंत 1 लाख 17 हजार तिकिटे बुकींगसाठी विकली आहेत, अशी माहिती समोर येते आहे. त्यामुळे आत्तापर्यंत या चित्रपटानं 9 कोटींचा गल्ला भरला आहे. आयनॉक्सकडून 38 हजार 500 तर पीव्हीआरकडून 51 हजार तिकीटे आत्तापर्यंत विकली गेली आहेत. सिनेपोलिसतर्फे 27 हजार 500 तिकिटे विकली गेली आहेत.

हेही वाचा – Kareena Kapoor: बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटल्यानंतर करीनाचं मोठं पाऊल? लवकरच उघडणार गुपितं…

पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट पॅन इंडिया (Pan India) प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह तामिळ, तेलूगु, मल्ल्याळम आणि कन्नड या चित्रपटांतून तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान, दीपिका पादूकोनसह जॉन अब्राहम, आशुतोष राणा अन्य काही कलाकारही आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी याचच अर्थ प्रेक्षकांनी तुडूंब गर्दी केली आहे. Source link

Leave a Reply