Pathaan Leaked Online : रिलीजला काही तास शिल्लक असताना शाहरूखचा पठाण लीक, ‘या’ साईट्सने केला दावा!


Shah Rukh Khan Pathaan Leaked Online : बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज रिलीज (Pathaan Movie) झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला (Pathaan Break Record) सुरुवात केली आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच 24 कोटींची कमाई केल्याने सिनेमा धुरळा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशातच आता शाहरूख खानला मोठा धक्का बसलाय. 

सिनेमा रिलीजच्या पहिल्याच दिवशी पठाणच्या टीमला मोठा धक्का बसलाय. चित्रपट प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना हा सिनेमा ऑनलाईन लीक ( Pathaan Leaked Online) झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा एचडीमध्ये देखील लीक झालाय. (Shah Rukh Khan movie Pathaan Leaked Online A Day Before Release latest marathi entertainment news)

कोणत्या साईट्सने दावा केलाय?

Tamil Rockers, MobieRulz, 123movies, Worldfree4u, The pirate bay आणि इतर टोरेंट सारख्या साइट्स पठाण रिलीज झाल्यानंतर लगेचच उद्या लीक करण्याचा दावा करत आहेत.

आणखी वाचा – Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो…

पठाणच्या विरोधात अनेक लोक निषेध करत असल्यानं आणि त्याच्या यशात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्यानं, चित्रपट लीक (Pathaan Movie Available Online) झाल्याचा दावाही या मोठ्या कटाचा एक भाग असू शकतो.

दरम्यान, पायरसी हा IPC अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे आणि आम्ही प्रत्येकाला त्यात भाग न घेण्याचा सल्ला देतो. जरी पठाण उद्या पायरसी साइट्सवर अपलोड झाला, तरीही योग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास ते काढून टाकला जाऊ शकतो.Source link

Leave a Reply