Headlines

Password Tricks: महत्त्वाच्या अकाउंट्सचे पासवर्ड लक्षात राहत नसतील तर, घ्या Google ची मदत ,पाहा ट्रिक्स

[ad_1]

नवी दिल्ली: Forget Password: आजकाल Online Payments पासून ते प्रत्येक अकाउंटसाठी पासवर्ड वापरवा लागतो. पासवर्डमुळे स्मार्टफोन तर सेफ राहतो. पण, प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड लक्षात ठेवणे जवळ-जवळ प्रत्येकालाच कठीण जाते. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, तुम्ही Google ची मदत घेऊ शकता. पासवर्ड मॅनेजर तुमचे सर्व पासवर्ड ट्रॅक करतात. शिवाय, तुम्ही हे पासवर्ड कधीही पाहू शकता. याव्यतिरिक्त, ते तुम्हाला पासवर्ड टाइप न करता बहुतेक वेबसाइटवर साइन इन करण्याची परवानगी देतात. तुमच्याकडे Android फोन असल्यास आणि लिंक केलेले Google Account असल्यास, तुम्ही Google चे Password Manager वापरू शकता. अँड्रॉईड फोनमध्ये पासवर्ड सेव्ह कसे करायचे पाहुया.

वाचा: राहा तयार, लवकरच लाँच होणार Apple AirPods Pro 2, चार्जिंग केसमध्ये मिळेल Speaker

फोनवर सेव्ह केलेला पासवर्ड कसा शोधायचा ?

सर्वप्रथम, तुमच्या Android फोनवर Google Chrome ब्राउझर सुरू करा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. काही डिव्हाइसेसवर, हे ३ डॉट्स तळाच्या कोपर्यात देखील असू शकतात. . नंतर पॉप-अप मेनूमधील सेटिंग्ज वर टॅप करा. आता तुम्हाला पुढील मेनूमध्ये पासवर्डवर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा फेस किंवा टच स्कॅन टाकावा लागेल. आता तुमच्यासमोर वेबसाइट्सची एक लांबलचक यादी दिसेल, ज्यामध्ये युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह केला जाईल.

वाचा: Best Plans: Jio चा ‘हा’ प्लान देतो Airtel-VI ला टक्कर, ४०० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळते डेटा-कॉलिंगसह ९० दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी

ज्या साइटसाठी तुम्हाला तुमचा पासवर्ड हवा आहे त्यावर टॅप करा, त्यानंतर पासवर्ड विचारण्यासाठी डोळ्याच्या चिन्हावर टॅप करा. तुम्हाला हा पासवर्ड इतरत्र कॉपी आणि पेस्ट करायचा असल्यास (ईमेल किंवा नोटमध्ये), त्याच्या शेजारी दोन स्टॅक केलेल्या चौकोनी icon वर टॅप करा. हे तुमच्या फोनच्या क्लिपबोर्डवर पासवर्ड कॉपी करेल.

वाचा: अधिक Virtual RAM ऑफर करणारा फोन चांगला की, जास्त Physical RAM देणारा, तुमच्यासाठी काय बेस्ट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *