परिकथेमागची गोष्ट… प्रेमभंगानंतर अभिनेत्रीला सापडलं खरं प्रेम, लग्नाचे ते भावनिक क्षण तुम्ही पाहिले?


Wedding – साऊथ सिनेसृष्टीतील सगळ्या सुपरस्टार लग्नाच्या बेडीत अडकले. जेवढी त्यांचा कामाची चर्चा होते तेवढीच या दोघांची प्रेमकहाणी होते. 2015 मधील नानुम राउडी धान या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) भेटले. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 

या लव्हबर्डने 6 वर्षे डेट केल्यावर 9 जूनला महाबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये आपल्या प्रेमाला लग्नाच्या बंधनात अडकवलं. यांचा लग्नाची (Wedding) घोषणा होतातच सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो असो किंवा मग लग्नाची तयारीचे फोटो असो तुफान व्हायरल झाले होते. (nayanthara and vignesh shivan wedding documentary is coming soon to netflix and wedding documentary teaser out in marathi)

हम दोन प्रेमी…

या प्रेमींच्या लग्नाचे सुंदर क्षण तुम्हाला पाहायचे असेल तर त्या तुम्हाला ती संधी मिळणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना आता या सुंदर सोहळ्यांचं साक्ष होता येणार आहे. 

नेटफ्लिक्सने(Netflix) Nayanthara: Beyond the Fairytale या documentaryचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरची सुरुवात नयनतारा यांचा विवाह क्षणापासून होते. या documentary नयनतारा म्हणते, मी फक्त कामावर विश्वास ठेवते. मला हे जाणून खूप आनंद झाला की आपल्या आजूबाजूला खूप प्रेम आहे.

तर या टीझरमध्ये विघ्नेश म्हणतो की, एक स्त्री म्हणून मी तिच्या स्वभावावर प्रेम करतो. तिचे चरित्र स्वतःच प्रेरणादायी आहे आणि ती आतून खूप सुंदर आहे.”

”लेडी सुपरस्टार नयनताराच्या प्रवासाबद्दल एक जादूई documentary” असं कॅप्शन नेटफ्लिक्सने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.  ही  documentary दिग्दर्शन गौतम वासुदेव मेनन यांनी केली आहे. तर विघ्नेशच्या राऊडी पिक्चर्सने याची निर्मिती केली आहे. लवकरच  Netflix  चाहत्यांसाठी ही documentary घेऊन येत आहे. Source link

Leave a Reply