‘मुलांना जन्म देण्याआधी पालकांना Training ची गरज’, Twinkle Khanna चं मोठं वक्तव्य


Twinkle Khanna On Parenting Training : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ट्विंकल चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही मात्र ती तिच्या पुस्तकांमुळे चर्चेत असते. ट्विंकल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, ट्विंकल खन्नानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलाखत शेअर केली आहे. यावेळी ट्विंकल खन्ना पालकत्वावर बोलली आहे. यावेळी ट्विंकल तिच्या दोन्ही मुलांविषयी देखील बोलली आहे. इतकंच काय तर ती पुढे मुलांना जन्म देण्यापूर्वी पालकांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिले पाहिजे, याविषयी बोलली आहे. 

ट्विंकल खन्नानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी ट्विंकल पालकत्वावर तिचे विचार शेअर करताना दिसते. मुलांचे संगोपन करण्याचा योग्य मार्ग त्यांना त्याची ट्रेनिंग देऊन समजवायला हवं. जेव्हा ट्विंकलला पुढे विचारण्यात आलं की मुलींना सांभाळण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आणि मुलांचे संगोपन योग्यरित्या होण्यावर खूप कमी लिहिलं. यावर ट्विंकल म्हणाली, मुलांचे संगोपन करण्यावर मी खूप कमी लिहिलं आहे आणि असे नाही की फक्त मुलींचे संगोपन करण्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही मला विचाराल तर, ज्याप्रमाणे तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट क्लिअर केल्यानंतर गाडी चालवण्यासाठी लायसंसं मिळतं, त्याप्रमाणे पावक होण्यासाठी देखील प्रशिक्षण करण आवश्यक आहे. 

पालकत्वावर टिप्स देताना ट्विंकल पुढे तिच्याप्रमाणे मुलांचे संगोपन कसे करावे यावर सांगताना दिसते. समाजात बदल घडवून आणण्यासाठी पुढच्या पिढीला कसे तयार करता येईल, असे विचारले असता ट्विंकल म्हणाली, ‘मी तज्ञ आहे असे समजून मला असे प्रश्न विचारत आहात. ‘खरंतर मी स्वत: थांबून हे पाहायला पाहिजे की माझी मुलं माझ्यासमोर कशी मोठी होत आहेत. ‘ (Parenting Tips) 

हेही वाचा : ‘बबिताजींनी पाहिलं असतं तर…’, जेठालालचा हा Unseen Photo पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

ट्विंकल खन्नानं 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. ट्विंकलला तिच्या या चित्रपटासाठी फिल्मफेअर डेब्यूचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ट्विंकलनं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाही. ‘जान’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘उफ्फ ये मोहब्बत’, ‘इतिहास’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘जुल्मी’, ‘बादशाह’, ‘मेला’, ‘चल मेरे भाई’, ‘जोरू का गुलाम’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटांमध्ये ती दिसली. तर तिच्या लेखिका म्हणून करिअरविषयी बोलायचं झालं तर तिनं आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पायजामा इज फॉरगिव्हिंग’Source link

Leave a Reply