पंत टेन्शनमध्ये असताना यांचं काय मध्येच? मैदानात भिडले चहल-कुलदीप, पाहा व्हिडीओ


मुंबई : राजस्थान विरुद्ध दिल्ली झालेल्या मॅचमध्ये सगळ्यांनी नो बॉलवरून झालेला ड्रामा पाहिला. पण या दरम्यान एक गोष्ट नजरेतून सुटली. मैदानात एकीकडे पंत टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे कुलदीप आणि युजवेंद्र चहलचं काहीतरी भलतच सुरू होतं. 

राजस्थान टीमने दिल्लीवर 15 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर वाद झाला. तो नो बॉल असल्याचा दावा पंतने केला. मात्र अंपायरने तो दिला नाही. त्यामुळे अंपायरचा निर्णय चुकल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून मैदानात काहीवेळ तणावाचं वातावरण होतं. 

एकीकडे पंत या सगळ्या तणावात होता. तर दुसरीकडे मैदानात कुलदीप आणि युजवेंद्र चहल एकमेकांशी भांडत होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पंतने कुलदीपला मैदानातून परत बोलवलं त्यावेळी युजवेंद्रने त्याला अडवलं. त्यांच्यात मजामस्तीमध्ये हे भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काही युजर्स म्हणाले की पंतचा राग पाहिला पण यांना मिस केलं त्यामुळे नाराजीही व्यक्त केली आहे. सध्या या दोघांची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

आयपीएलमध्ये कुलचा जोडीनं धुमाकूळ घातला. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने एकामागे एक उत्तम कामगिरी करून विकेट्स काढल्या. या दोघांची उत्तम कामगिरी पाहता टी 20 वर्ल्ड कपसाठी या दोघांना टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. Source link

Leave a Reply