पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या मलायकाला आता हवीये सेक्सी…


मुंबई : बॉलिवूडमध्ये अगदी सुरुवातीपासूनच अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा हिनं तिची वेगळी प्रतिमा तयार केली आहे. आघाडीच्या अभिनेत्रींमध्येही मलायका तिची जागा इतक्या वर्षांनंतर कायम राखून आहे. वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करत असतानाही, फिटनेस आणि फॅशनच्या बाबतीत ती बरीच अपडेटही आहे. (Malaika Arora)

वाढत्या वयाचा तिच्यावर काहीच परिणाम होताना दिसत नाही. आहारातील समतोल, व्यायाम यावर भर देणारी मलायका इतकी ग्लॅमरस कशी, हा प्रश्न तुम्हालाही पडतो ना? 

खुद्द मलायकानंच याबाबतचा उलगडा केला. जिथं तिनं मला कधीच फिकी किंवा थंड पडलेली, असं म्हणण्यापेक्षा सेक्सी आणि उत्स्फूर्त म्हटलं तर जास्त आवडेल असं ती म्हणाली. 

स्वभावानंही मी उत्साही असल्यामुळे मला असंच ओळखलं जावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली. 

महिन्यातील 15 दिवस असे असतात जेव्हा मी अतिशय उत्साही असते. तर काही दिवस असे असतात जेव्हा मी फार संघर्ष करत असते. कारण सर्वच महिला महिन्यातील या अशा दिवसांतून जात असतात, असं ती म्हणाली. 

बरं तुमच्याआमच्या प्रमाणे माझं वजन तर नाही वाढत आहे ना, मला कसलंतरी दु:ख वाटतंय, कधीकधी तर मी ज्या मानसिक स्थितीमध्ये आहे त्यातच काही बिनसलंय असंही मलायकाच्या मनात येतं. 

प्रत्येक पांढरा केस आपल्याला आणखी समजुतदार, प्रेमळ आणि आनंदी करुन जातो, असा विचार तिनं सर्वांसमोर ठेवला. फक्त स्टाईल स्टेटमेंट नव्हे, तर मलायकानं तिच्या बोलण्यातून या विचारांनीही सर्वांचीच मनं जिंकली. Source link

Leave a Reply