…पण मला तुला तसं बघायचं नव्हतं… आमिरने आकाश ठोसरबाबत का केलं असं वक्तव्य


मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाचं आमिर खानकरता स्पेशल स्क्रिनिंग झालं. सिनेमा पाहिल्यानंतर आमिर खानने दिग्दर्शक नागराजचं भरभरून कौतुक तर केलंच. पणसोबतच अभिनेता आकाश ठोसरबाबत मला एक विशेष वक्तव्य देखील केलं आहे. 

आकाश ठोसरने या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारल्याचं ट्रेलरमधून तरी दिसत आहे. आकाशने नागराजच्या ‘सैराट’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेच्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. (‘झुंड’ सिनेमा मराठीत का नाही? या प्रश्नावर नागराजचं चपखल उत्तर) 

आकाश ठोसर देखील टीम झुंडसोबत आमिर खानच्या घरी गेला होता. तेव्हा त्याला बघून आमिर खानने घट्ट मिठी मारली. 

आमिर खानकडून आकाशचं विशेष कौतुक 

आमिर खानने आकाश ठोसर येताच पहिली त्याला मिठी मारली. तुला नागराजने ही भूमिका का दिली? I Love You, मला तू आवडतोस. म्हणून तुला अशी नकारात्मक भूमिका का दिली? मला तुला असं पाहायचं नव्हतं, अशा शब्दात आमिरने आकाशचं कौतुक केलं. (‘मी निःशब्द…’, आमिर खानकडून नागराजच्या ‘झुंड’चं कौतुक) 

सैराटनंतर आकाश घराघरात पोहोचला. त्याची लोकप्रियता वाढत गेली. त्याच्या अभिनयासोबतच तिच्या खासगी आयुष्याबद्दलची चर्चा असते. 

सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आमिरकडून ‘झुंड’ सिनेमाचं कौतुक 

‘झुंड’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासाठी सिनेमाचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. स्क्रिनिंगला नागराज मंजुळेसह सिनेमातील कलाकार उपस्थित होते.

‘झुंड’ हा आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक असल्याचं मत आमिर याने व्यक्त केलं. सिनेमा पाहताना आमिरच्या डोळ्यात अश्रूही आले होते.

सिनेमा संपल्यानंतर उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी पहिल्यांदाच एका सिनेमाच्या खासगी स्क्रिनिंगला सगळ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या, असंही आमिर म्हणाला.Source link

Leave a Reply