Headlines

”… पण मला कधी टेलेंट मिळतं नाही”; स्टार कीड्सना लॉन्च करूनही करण जोहर असं का म्हणाला?

[ad_1]

Karan Johar and Ritiesh Deshmukh: करण जोहर (Karan Johar) आपल्या लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणमधून (Coffee With Karan) तो अनेकवेळा सेलिब्रेटींना बेधडक प्रश्न विचारत असतो. त्याचप्रमाणे सेलिब्रेटीही त्याला बिन्धास्त उत्तरे देत असतात. पण यावेळी करण जोहर कोणाला प्रश्न विचारत नव्हता तर तो विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरे देत होता. होय, हे खरं आहे आणि हे घडून आलंय ते रितेश देशमुखच्या केस तो बनता हैं या चॅट शोमध्ये. (director karan johar attends case toh batna hai show host ritesh deshmukh asks him questions about nepotism)

अभिनेता रितेश देशमुख, (Ritiesh Deshmukh) वरुण शर्मा आणि कुशा कपिला यांनी होस्ट केलेल्या ‘केस तो बना है‘(Case toh Banta Hai) या शोमध्ये करण जोहरला त्या तिघांनी अक्षरक्षः गोत्यात आणले होते. चर्चेत असलेल्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येतात ज्यांच्यावर रितेशच्या कोर्टरूममध्ये वेगवेगळे आरोप केले जातात. आरोप-प्रत्यारोपांसोबतच खूप धमाल-मस्करीही केली जाते. नुकताच प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा त्याला रितेशनं थेट नेपोटिझमचा प्रश्न केला. 

एमेझॉन डॉट इन (Amazon.in) च्या या लोकप्रिय कोर्टरूम ड्रामा रिअॅलिटी शोमध्ये एका बाजूला वकील रितेश, दुसऱ्या बाजूला वकील वरुण, तर कुशा न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसली होती. यावेळी रितेशनं करणला नेपोटिझमवर थेट पण अप्रत्यक्षपणे प्रश्न केला त्यावर करण जोहरनं कबूल केले की तो टॅलेंट शोधत असतो पण त्याला काही केल्या ते मिळत नाही. 

इंडस्ट्रीमध्ये अनेकदा असे म्हटले जाते की करण स्टार किड्सना संधी देतो आणि त्यांनाच प्रमोट करतो. हाच आरोप रितेशनं यावेळी करणवर केला आणि त्यावेळी करणचं उत्तर ऐकून तुम्हीही यावर काय म्हणाल? 

रितेशने करण जोहरला कोर्टरूममध्ये उभे केले आणि त्याला प्रश्न विचारला, ‘तुम्ही तुमच्या चित्रपटात एखाद्या अभिनेत्याला कास्ट करता तेव्हा मला सांगा, तुम्ही कास्ट करताना त्यांच्यात असं काय पाहता? – चांगला लूक, चांगला लुक की चांगला लुक.’ यावर करण जोहरने उत्तर दिले की, ‘मी मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजनपाहतो. कधी-कधी मला टॅलेंट, टॅलेंट आणि टॅलेंट दिसतं पण ते कधीच सापडत नाही.’ 

आता करणच्या या विधानावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत परंतु त्याच्या या विधानानं इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांमध्ये नक्की काय पटेल हे येणार काळच ठरवेल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *