PAN कार्डशी Aadhaar कार्ड लिंक आहे की नाही, असं चेक करा, खूपच सोपी प्रोसेस


नवी दिल्लीः पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च आहे. याआधी तुम्हाला दोन्ही कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर पॅन कार्ड १ एप्रिल २०२३ पासून बिनकामाचे डॉक्यूमेंट होईल, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासोबत बँकेतून पैशांची देवाण घेवाण सुद्धा करता येवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही ३१ मार्च आधीच हे लिंक करणे गरजेचे आहे.

१ हजार रुपये दंड द्यावे लागणार
३१ मार्च २०२३ नंतर पॅनला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. सर्व भारतीय नागरिकांनी ३१ मार्च २०२३ च्या आधी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. परंतु, प्रश्न असा उठतो की, अखेर हे कसं जाणून घ्यावं. आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसं कळणार. ही पद्धत खूपच सोपी आहे. तुम्ही घरी बसून सहज हे माहिती करून घेवू शकता. तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही. जाणून घ्या डिटेल्स.

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा

कसे ओळखाल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही

  • पॅनला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स विभागच्या वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार स्टेट्स’ वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल.
  • यात तुम्हाला View Link Aadhaar Status’ वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल.
  • यानंतर तुम्हाला माहिती होईल की, तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही.

वाचाः HDFC खातेधारक टार्गेट, SMS मधील लिंक क्लिक करू नका, काय आहे SMS फिशिंग लिंक, जाणून घ्या
पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन मध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. याआधी पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली होती. नंतर ती ५०० रुपये वाढवून दंडा सोबत वाढून ३० जून २०२२ पर्यंत करण्यात आली होती. तर ३१ मार्च २०२३ नंतर १ हजार रुपये दंड भरावा लागेल.

वाचाः मेस्सी जैसा कोई नही, स्टाफला गिफ्ट केले ७३ लाखाचे ३५ गोल्ड फोन, काय आहे या फोनमध्ये, पाहा डिटेल्स

Source link

Leave a Reply