Headlines

पाकिस्तानी अभिनेत्रीकडून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल धक्कादायक खुलासा, ”तो माझे अंडरगार्मेंट…”

[ad_1]

मुंबई : असं म्हणतात की, प्रेमात व्यक्ती काहीही करण्यासाठी तयारी दाखवतो. मग तो एक सामान्य व्यक्ती असो की, कोणताही सेलिब्रिटी असो. सर्वांसाठी प्रेम हे सारखंच असतं आणि प्रेमात करावा लागणारा त्याग कोणालाही चुकलेला नाही. परंतु जोडीदारांमधील गोष्टी चार लोकांसमोर येणं हे खूपच वाईट आहे. अशाच एक प्रकार सेलिब्रिटी जोडप्यांसोबत घडला आहे. वीणा मलिक आणि अश्मित पटेल यांच्या नात्याचीने एकेकाळी खळबळ उडाली होती. ब्रेकअपनंतर वीणा मलिकाने अश्मित पटेलबद्दल अनेक खुलासे केले.

बॉलिवूड अभिनेता अश्मित पटेल आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 4’ च्या घरात दोघांमध्ये सुरू झालेली जवळीकता घरातून बाहेर पडल्यानंतरही सुरूच होती, मात्र काही काळानंतर त्या दोघांचं भांडण झालं आणि ते वेगळे झाले.

मात्र असे असले तरी, शोदरम्यान दोघांनी दिलेले बोल्ड आणि रोमँटिक क्लिप किंवा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर वीणा मलिक आणि अश्मित पटेल काही प्रायवेट आणि बेडरूमचे सीन नॅशनल टेलिव्हिजनवर प्रसारित झाले आहेत. ज्यावरुन बराच वाद झाला.

परंतु आजही लोकांना त्यांची केमिस्ट्री पाहायला आवडते. म्हणून त्यांचे व्हिडीओ अधूनमधून ट्रेंड होत असतात.

Veena Malik Stated that Ashmit Patel used to wash her undergarments in Bigg  Boss House | पाकिस्तानी एक्ट्रेस के अंडरगार्मेंट्स धोते थे अमीषा पटेल के  भाई, प्यार में पार कर दी थी

सध्या ते आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आले आहेत, ते म्हणजे वीणा मलिकचं वक्तव्य.

ब्रेकअपनंतर वीणा मलिकने अश्मितबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वीणाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ती बिग बॉसच्या घरात होती तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड अश्मित पटेल तिचे अंडरगार्मेंट धुत असे.

इतकंच नाही तर रागाच्या भरात वीणाने खुलासा केला की, अश्मितला ती आपल्या हिल्स किंवा चपलने देखील मारायची.

या दोघांचे सर्व रोमँटिक फोटो आणि व्हिडीओंसोबतच, वीणा आणि अश्मितच्या त्या व्हिडीओनेही खूप खळबळ उडवून दिली होती, ज्यामध्ये वीणा अश्मितच्या केसांना प्रेमाने मसाज करताना दिसली होती.

लोकांनी शोच्या रात्री घरात त्या दोघांना एकमेकांचे किस्स घेताना देखील पाहिलं आहे. परंतु सीझन संपल्यानंतर लगेचच वीणा आणि अश्मित वेगळे झाले. बिग बॉसनंतर ती सुपरमॉडेल या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *