पाकिस्तानी अभिनेत्याचा हॉलीवूडच्या अभिनेत्रीला Kiss, सोशल मीडियावर खळबळ


मुंबई : नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो पैकी एक ‘द क्राउन’ चा सीझन 5 (The Crown season 5) स्ट्रीम झालाय. द क्राऊन मध्ये ब्रिटीश राणी एलिझाबेथ II आणि तिच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. शोच्या पाचव्या सीझनमध्ये प्रिन्स चार्ल्स (आताचा राजा चार्ल्स तिसरा) आणि राजकुमारी डायना यांचा विवाह आणि घटस्फोट याची कथा आहे.

हुमायू सईद आणि एलिझाबेथ डिबेकी यांच्या केमिस्ट्रीचीही चर्चा आहे. त्यांचा किसिंग सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, प्रिन्सेस डायना आणि डॉक्टर हसनत खान (Dr Hasnat Khan) यांची पहिली भेट 1995 मध्ये झाली होती. काही काळानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. दोघेही आपले नाते जगाच्या नजरेपासून लपवत होते. डायनाचा मृत्यू ऑगस्ट 1997 मध्ये कार अपघातात झाला होता.

प्रिन्सेस डायनाचा घटस्फोट झाल्यानंतर तिने ब्रिटिश-पाकिस्तानी हार्ट सर्जन डॉ हसनत खान यांना डेट करणे सुरु केले. पाकिस्तानी अभिनेता हुमायून सईदने ‘द क्राउन’मध्ये डॉक्टर हसनत यांची भूमिका साकारली आहे. डायनाची भूमिका करणारी हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ डिबेकी (Elizabeth Debicki) आणि हुमायू (Humayun) यांच्यातील एक किसिंग सीन या शोमध्ये दाखवण्यात आला आहे, ज्याची खूप चर्चा आहे.

पाकिस्तानी अभिनेता हुमायू सईद आणि हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ डिबेकी यांना किस करताना पाहून चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. याबाबत ट्विटरवर वादळ उठले आहे. हुमायून आणि एलिझाबेथ यांच्यातील ही किस सीन पाहून अनेक युजर्सनने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हुमायू सईदच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की, त्याने सीरीजमध्ये किस सीन दिला आहे. काहींनी त्याच्यावर टीका केलीये. काही जण समर्थन ही करत आहेत.Source link

Leave a Reply