Headlines

पाकिस्तानला पराभवाची धुळ चारणाऱ्या Virat कोहलीच्या फिटनेसचं सीक्रेट काय?

[ad_1]

Virat Kohli Fitness : T20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीची खेळी पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहलीने शानदार खेळी केली. त्यामुळे त्याचं चाहते खूपच खूश झाले आहेत. विराट कोहली सध्या 33 वर्षांचा आहे. पण त्याचा फिटनेस पाहून अनेक जण त्याच्याकडून प्रेरणा घेतात. विराट कोहली युवा खेळाडूंना ही लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. विराटच्या फिटनेसचे रहस्य त्याची जीवनशैली आहे. कोहली त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असतो. विराट कोहलीच्या या फिटनेसचं सीक्रेट काय आहे. चला जाणून घेऊयात.

1. धावणे

धावण्याने कॅलरीज लवकर बर्न होत असतात. चांगलं तंदुरुस्त शरीर मिळविण्यासाठी धावणे आवश्यक आहे. विराट कोहलीचे वजन नियंत्रणात आहे, यामागे धावणे हे एक कारण आहे. धावल्याने स्नायूही मजबूत होतात. धावण्याने स्टॅमिना वाढतो.

2. उठाबशा

फिटनेसमध्ये विराट कोहली चित्रपटाच्या हिरोला ही मागे टाकेल. विराट कोहलीचे सिक्स पॅक अॅब्स पाहून अनेक जण थक्क होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिट-अप करण्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. असे सोपे व्यायाम तुम्ही घरी करू शकता.

3. वजन उचलणे

शरीर तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. शरीर मजबूत करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी वेटलिफ्टिंग फायदेशीर आहे. तुमच्या क्षमतेनुसार वजन उचलण्यास सुरुवात करा. उत्तम शरीर मिळवण्यासाठी वेटलिफ्टिंग आवश्यक आहे.

4. पुश अप्स

शरीराच्या चांगल्या आकारासाठी पुशअप आवश्यक आहेत. एका हाताने पुशअप्स केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. असे केल्याने छाती आणि खांद्याला चांगला आकार येतो. पुशअप्स केल्यानेही शरीर मजबूत होते.

5. पोहणे

पोहणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच चरबी कमी होते आणि स्नायू मजबूत होतात. पोहण्यामुळे कॅलरीज बर्न होतात. फ्रीस्टाइल पोहणे फिटनेससाठी फायदेशीर आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *