Pak Vs Aus सामन्यात David Warner चा भर मैदानात भांगडा डान्स, Video Viral


Aus vs Pak Test : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Aus Vs Pak) यांच्यात सुरू असलेला कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि पाकिस्तानी संघ पुन्हा एकदा फलंदाजी करत होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर मस्तीच्या मूडमध्ये दिसला. डेव्हिड वॉर्नर जेव्हा मैदानावर फिल्डिंग करत होता तेव्हा त्याने जबरदस्त डान्स केला.

डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. अनेकदा त्याचे टिकटॉक व्हिडिओ, इंस्टाग्राम रील्स व्हायरल होत असतात. रावळपिंडीत ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला तेव्हा मैदानात गाणी वाजत होती. डेव्हिड वॉर्नरने ही मग ताल धरला आणि नाचू लागला. क्षेत्ररक्षणादरम्यान वॉर्नरची ही शैली पाकिस्तानी चाहत्यांना खूपच आवडली.

फॉक्स क्रिकेटने डेव्हिड वॉर्नरच्या डान्सचा व्हिडिओही शेअर केलाय. विशेष म्हणजे त्याने विराट कोहलीच्या डान्सचा व्हिडिओही शेअर केला आहे. विराट कोहली अनेकदा मैदानावर मस्तीच्या मूडमध्ये दिसतो, तोच प्रकार नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत पाहायला मिळाला.

या सामन्यात डेव्हिड वॉर्नरचा एक वेगळाच डान्स पाहायला मिळत आहे. डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करत असतानाही पाकिस्तानी गोलंदाजांनी त्याला वारंवार चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. शाहीन शाह आफ्रिदीपासून ते नसीम शाहपर्यंत अनेक गोलंदाजांनी डेव्हिड वॉर्नरची स्लेजिंग केली, पण त्याने पुन्हा पुन्हा हसून प्रत्युत्तर दिले.

रावळपिंडीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 476 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या डावात 459 धावा केल्या. पाकिस्तान संघ दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करत आहे.Source link

Leave a Reply