Headlines

पैठणमध्ये पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यासह तिघांना पकडले

[ad_1]

औरंगाबाद – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असून छापा टाकायचा नसेल तर ५  कोटींची मागणी एका सराफा व्यावसायिकाकडे मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यासह तिघांना पैठण पोलिसांनी रविवारी पकडले. तर दोघांचा शोध घेणे सुरू आहे. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल व निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

तोतया सीबीआय अधिकारी विठ्ठल नामदेव हरगुडे (रा. पुणे), मास्टरमाईंड रघुनाथ बन्सी इच्छैय्या व त्याचा ड्रायव्हर मुथ्यु गुरुटे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर डॉ.धनंजय गाढे व विनोद पोटफोडे यांचा शोध सुरू आहे. पैठणमधील सराफा व्यावसायिक प्रसाद लोळगे यांच्याकडे विठ्ठल हरगुडे आला. आपण सीबीआय ऑफिसर आहोत. तुमच्याविरोधात तक्रार आहे, दोन दिवसात एफआयआर दाखल होणार आहे. तत्पूर्वी वरिष्ठांनी पैठणमध्ये पाठवून पुरावा प्राप्त करण्यासाठी येथे आलो आहे. दुकानाची झडती घ्यायची असल्याचे विठ्ठल हरगुडे याने सांगताच प्रसाद लोळगे यांना संशय आला. त्यांनी बंधू तथा माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांना फोन करून बोलावून घेतले.  सूरज लोळगे तातडीने सराफा दुकानात आले. त्यांनाही हरगुडे याने तक्रार असल्याचे सांगत प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटींची मागणी केली. मात्र, प्रकरण ४ कोटींत मिटवून घेऊ, असे सांगताच सूरज लोळगे यांचा संशय बळावला. त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांना फोन केला. पोलीस लोळगे यांच्याकडे पोहोचले. चौकशीत तोतयागिरी उघड झाली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता विठ्ठल हरगुडे, डॉ. धनंजय गाढे, त्यांचे मास्टर माईंड रघुनाथ बन्शी इच्छैय्या व त्यांचे सहकारी मुथ्यु गरूटे, विनोद पोटफोडे ही नावे समोर आली. या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *