पाहताक्षणी Miss India च्या प्रेमात पडला हा चिमुकला; वयाचं भान न ठेवता तिच्याशीच बांधली लग्नगाठ


मुंबई : चित्रपट जगतामध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांना फार कमी वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. बालवयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर अशाच एका ‘प्रिन्स’नं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का? 

हिंदी चित्रपट रसिकांसाठी या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण असेल, कारण सध्या हा अभिनेता त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीतच आहे. पण, दाक्षिणात्य कलाजगतात मात्र त्यानं स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. 

Mahesh Babu

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि विविधभाषी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असणारा हा अभिनेता आता पन्नाशीत असला तरीही त्याची Chocolate Boy ही प्रेक्षकांमध्ये असणारी प्रतिमा पुसणं कठीणच. तुम्हाला माहितीये का, या अभिनेत्यानं एकेकाळच्या Miss India शीच लग्नगाठ बांधली. (south indian actor Mahesh Babu wife namrata shirodkar love story)

हा अभिनेता आहे, महेश बाबू (Mahesh Babu). महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची पहिली भेट 2000 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली. ‘वामसी’ असं त्या चित्रपटाचं नाव. हे दोघंही त्यामध्ये मुख्य भूमिका साराकत होते. तेव्हाच त्यांच्यात प्रेमाचं नातं बहरलं. 

जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी 2005 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, सुरुवातीला मात्र त्यांच्या प्रेमाची चाहूल कुटुंबीयांनाही नव्हती. लग्नाआधी महेश बाबूनं नम्रतापुढे एक अट ठेवली होती, असंही म्हटलं जातं. 

Mahesh Babu family

लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम न करणं, हिच ती अट. नम्रतानंही ही अट मान्य केली. बॉलिवूडमध्ये कमाल प्रसिद्धी मिळवणारी नम्रता लग्नानंतर मात्र बी- टाऊनपासून दुरावली. कुटुंबाला प्राधान्य देत ती महेश बाबूचा आधार झाली. 

1993 मध्ये मिस इंडिया हा किताब मिळवणाऱ्या नम्रताला पाहताक्षणी महेश बाबू तिच्यावर भाळला होता. त्यामुळं हे पहिल्या नजरेतलं प्रेम त्याच्यासाठी अर्थातच खास होतं असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply