पाहा Video; आलिया भट्टसाठी Exotic Recepies बनवणारी शेफ सांगतेय चिंबोरी खाण्याची जगात भारी पद्धत


मुंबई : बाहेर मस्त पाऊस पडतोय, वातावरणात सुखद गारवा आपोआपच जाणवू लागला आहे आणि त्यातच आता जीभेचे चोचले वाढत चालले आहेत. ही अवस्था कोणा एकाची नाही, तर ती सध्या जवळपास सर्वांचीच आहे. सध्या श्रावण असल्यामुळे या सर्वांमधील काहीजण अर्थात याला अपवाद असतील, पण हरकत नाही. या धमाल वातावरणाचा कमाल आनंद देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Celebrity chef chinu vaze teaches perfect way of eating crab chimbori rassa watch video)

आलिया भट्टसाठी एक्झॉटिक रेसिपी बनवणाऱ्या आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री, लेखिका आणि उत्तम शेफ असणाऱ्या चिनू वझे अर्थात Shilarna Vaze नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

व्हिडीओमध्ये ती चक्क चिंबोरीचा रस्सा, ताव मारून खाताना दिसत आहे. चिंबोरीचा डांगा कसा खावा, याची जगात भारी पद्धत चिनू दाखवत आहे. तिला पाहून तुम्हालाही या Non Veg पदार्थाची चव चाखण्याची इच्छा होईल असं म्हणायला हरकत नाही. 

चिंबोरी रस्सा… जेवणात असला की, जेवणाची पंगत लांबली म्हणून समजा. चिनूच्या घरीसुद्धा याहून वेगळं वातावरण नव्हतं. त्याचीच आठवण तिनं कॅप्शनमध्ये शेअर केली. लाखेच्या चिंबोरी खाण्यापासून डांग्यामध्ये साठलेला रस्सा सुर्रsssकन ओढण्यापर्यंत सर्वकाही तिनं छान मसालेदार पद्धतीत मांडलं आहे. 

ही पोस्ट वाचताना बरेचजण थेट बाजारात चिंबोरी आणायला धाव मारतील, पण श्रावण पाळणाऱ्यांना मात्र या व्हिडीओवरच समाधान मानावं लागणार आहे. Source link

Leave a Reply