Headlines

पाहा मिथिला पालकरला पुन्हा भेटला ‘तो’; यावेळी तरी लग्न करणार का?

[ad_1]

मुंबई : ‘कप साँग गर्ल’ अशी ओळख असलेली मिथिला पालकर फार कमी वेळात प्रसिद्धीझोतात आली. वेब सीरिज, शॉर्टफिल्म आणि मग चित्रपट असा प्रवास तिनं केला आणि पाहता पाहता तिनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मिथिलानं तिच्या सहज अभिनयाच्या बळावर अनेकांनाच वेड लावलं. तरुणांच्या गळ्यातलं ताईत होण्यापर्यंतची मजल तिनं मारली. लाघवी सौंदर्य आणि बोलणं, निरागस रुप अशी मिथिला जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा तिनं नजरा वळवल्या. आताही ती चर्चेत येण्यास अशीच एक गोष्ट कारणीभूत ठरत आहे. ही गोष्ट म्हणजे मिथिलाच्या लग्नाची. 

काय ? मिथिला लग्न करतेय? कोण आहे तो? कधी करतेय ती लग्न? असे प्रश्न तुमच्या मनाल उदभवले असतील. पण, आता त्या प्रश्नांचा भडीमार करण्याऐवजी जाणून घ्या की लग्नापर्यंतच्या तिच्या प्रवासात काही अडथळेही आहेत. 

मनात असणारा भावनांचा कोलाहल, जबाबदाऱ्यांचं आणि अपेक्षांचं ओझं, दडपण या साऱ्यामुळं निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना या साऱ्याचाच मिथिला सामना करत आहे. पण, ती हे सगळं प्रत्यक्षात नव्हे तर प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजच्या निमित्तानं अनुभवत आहे. 

Netflix वर पुन्हा एकदा मिथिला पालकर आणि ध्रुव सेहेगल (Dhruv Sehgal Mithila Palkar) यांच्या मध्यवर्ती भूमिका साकारत असणाऱ्या ‘लिटील थिंग्स’ (Little Things 4) चा प्रिक्वल चाहत्यांच्या भेटीला येत आहे.  Audible Original स्वरुपात असणाऱ्या या सीरिजचं नाव असणार आहे, Little Things: Jab Dhruv Met Kavya. 

हे ऑडिबल आतापासूनच कुतूहलाचा विषय ठरत आहे, कारण ध्रुव आणि काव्या अर्थात मिथिला आणि ध्रुव साकारत असणाऱ्या या पात्रांची भेट कशी झाली, ते प्रेमात कसे पडले इथपासूनचा प्रवास या प्रिक्वल सीरिजमध्ये असणार आहे. इतकंच नव्हे, तर पहिल्या सीजनपूर्वी त्यांची आयुष्य कशी होती यावरही प्रकाशझोत टाकण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर लग्नापर्यंत पोहोचताना त्यांच्या वाटेत नेमके खाचखळगे का येत होते हेसुद्धा विस्तृतपणे सर्वांसाठी उलगडलं जाणार आहे. 

रेडिओवर तुम्ही एखादा कार्यक्रम ऐकता अगदी त्याच प्रकारे ही सीरिज सादर करण्यात येणार आहे. त्यामुळं ध्रुव आणि काव्याचा प्रवास तुम्ही पाहिलात आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यातलं Confusion अनुभवण्यासाठी तयार व्हा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *