Headlines

पाहा लतादीदींची लाडकी पोरं, मंगेशकर कुटुंबाची तिसरी पिढी

[ad_1]

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थानं गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचाही उल्लेख केला जातो. गेली कित्येत दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदींबद्दल लिहिणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. (Lata Mangeshkar)

इतकी मोठी कारकिर्द त्यातही गाठलेली यशशिखरं इतकी उंच, की त्यांची उंची गाठणंही कठीण. 

अशा दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 ला जगाचा निरोप घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी दीदी अनंतात विलीन झाल्या आणि आता या कुटुंबाचा वारसा पुढे कोण नेणार असाच प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. 

मुळात मंगेशकर कुटुंबाला कला आणि विशेष म्हणजे संगीताचा अभिजात वारसा लाभला आहे. 

मास्टर दिनानाथ मंगेशकर, त्यानंतर लतादीदी आणि त्यांची भावंड आणि आता त्यामागोमाग मंगेशकर घराण्याती नवी पिढीही कलेच्या सेवेत रुजू झाल्याचं दिसत आहे. 

राधा मंगेशकर 
लतादीदींचा धाकटा भाऊ, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी राधा. राधानं भारतीय संगीतातूनच शिक्षण घेतलं आहे. वयाच्या 7 व्या वर्षापासूनत ती कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती. 

हिंदी, मराठी आणि बंगाली भाषांमध्ये ती गायली आहे. ‘नाव माझे शामी’ हा तिचा अल्बम प्रचंड गाजला होता. 

जनाई भोसले 
जनाई भोसले ही, आशा भोसले यांचा मुलगा आनंद यांची मुलगी आहे. ती स्वत:सुद्धा संगीत क्षेत्रात सक्रीय आहे. ‘6 पॅक’ या भारतातील पहिल्या तृतीयपंथी बँडच्या प्रोजेक्टवर कामही सुरु केलं आहे. 

जनाई, सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. कायमच तिनं मंगेशकर कुटुंबाची वेगळी झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे. 

रचना खडीकर शाही
दीदींची धाकटी बहीण, मीना खडीकर यांची मुलगी रचना हिनं वयाच्या 5 व्या वर्षातच संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. मराठी व्यासपीठावर सादर करण्यात आलेल्या कैक नाटकांमध्येती तिनं भूमिका साकारल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *