सांगली जिल्ह्यातील या गावातील रोजगारासाठी बाहेरगावी असणार्‍यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

सांगली /विशेष प्रतींनिधी – हणमंत वडीये गावातील रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींनी एकत्र येत गावात कोरोना विषाणू प्रती जनजागृतीचे फ्लेक्स लावत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अलीकडच्या काही काळात कोरोना रुग्णांनाचे प्रमाण कमी होत आहे.असे असले तरी कोरोना अद्याप संपला नाही.नागरिकांनी गफिल न राहता योग्य ती काळजी घ्यावी. हयाबादल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने  हणमंत वडीये गावातील रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींनी एकत्र येत गावात कोरोना विषाणू प्रती जनजागृतीचे फ्लेक्स वाडी-वस्तीवर लावले आहेत.

या उपक्रमाची सुरवात डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉ.श्री अशोक मोरे यांनी रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींना एकत्र केली. आपण रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असलो तरी गावासाठी ,समाजाप्रती काहीतरी देणे लागतो.या उद्देशाने एकत्र येत  हणमंत वडीये गावातील युवक –युवतींना येरळामाई जनसहयोग फौंडेशनची स्थापना केली.

येरळामाई जनसहयोग फौंडेशनच्या वतीने गावातील वाडीवस्तीवर कोरोना जनजागृतीचे प्लेक्स लावण्यात आले.यावेळी बोलताना डॉ.श्री अशोक मोरे यांनी फौंडेशनच्या माध्यमातून गावातील लोकांच्या हिताचे उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी येरळामाई जनसह्योग फाऊंडेशन’ चे अध्यक्ष डॉ. अशोक मोरे सर, फाऊंडेशनचे खजिनदार इंजिनिअर कु. प्रदिप मस्के यांनी उपस्थित राहून आणि गावातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या जनजागृती उपक्रमाची सुरुवात केली. जनजागृती उपक्रमातील फ्लेक्स च्या लोकार्पण सोहळ्यासाठी गावातील सरपंच श्री. राहूल गुरव, उपसरपंच श्री विक्रम मोरे , कृष्णत कोकरे, जयवंत कोकरे, पांडुरंग कोकरे  आणि इतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

Leave a Reply