आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ


मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला. 

पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली. हताश झालेला कोहली मैदान सोडताना देवाकडे पाहून कितीतरी पुटपुटला आणि बाहेर पडला. 

त्याचा हा व्हिडीओ पाहून कोहलीची खरंच दया येते. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना अस्वस्थ करणारा आहे. विराट कोहली स्वत: वर राग काढत असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसलं. 

कोहलीने रागाच्या भरात आपली बॅट मैदानात आपटली. मैदानातून बाहेर पडताना हताशपणे तो आकाशाकडे पाहात काहीतरी पुटपुटला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात कोहलीने फक्त  20 धावा केल्या. कोहलीचा चाहते तो लवकर फॉर्ममध्ये यावा यासाठी प्रार्थना करत आहेत. Source link

Leave a Reply