इतरांपासून लपवून ठेवा फोनमधील महत्वाचे Apps, प्रायव्हसीसाठी फॉलो करा भन्नाट ट्रिक्स


नवी दिल्ली:Smartphone Privacy Tips:स्मार्टफोन आता केवळ कॉलिंग पुरते मर्यादित नाही, डिजिटल जग आणि Social Media च्या या काळात प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक Apps असतात, ज्यामध्ये त्यांचा भरपूर Personal Data सेह केलेला असतो. अशात स्मार्टफोन युजरकडेच असला तर डेटा सुरक्षित राहतो. पण, जर युजरच्या नकळत एखाद्याने सुरक्षित लॉक स्क्रीन पासवर्डसह स्मार्टफोन अनलॉक केला. तर, वैयक्तिक तपशील आणि डेटामध्ये सहज प्रवेश केला जाऊ शकतो. अशा परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी, तुम्ही तुमचे वैयक्तिक किंवा महत्त्वाचे अॅप्स लपवू शकता.

वाचा: Netflix आणि Hotstar फ्रीमध्ये ऑफर करणारे Jio चे सुपरहिट प्लान्स ,सोबत अनलिमिटेड डेटा सारखे बेनिफिट्स

Google Play Store वर अनेक अॅप्स आहेत जे मोबाइल Apps Hide करण्याचा दावा करतात. परंतु, या अॅप्सना डेटा चोरी आणि तोटा होण्याचा धोका जास्त असतो. पण, आता काळजीचे कारण नाही. आजकाल स्मार्टफोन कंपन्या फोनमध्येच अॅप लपवण्याचा पर्याय देत आहेत. फोनच्याच Security Settings चा वापर करून अॅप कसे हाईड करायचे ते जाणून घ्या.

वाचा: QR Code स्कॅन करताना राहा अलर्ट, लहान चूक सुद्धा रिकामे करू शकते बँक अकाउंट

अॅप कसे लपवायचे?

आजकाल बहुतेक अँड्रॉइड फोन्समध्ये इन-बिल्ट अॅप लपवण्याची सुविधा असते. Apps लपवण्यासाठी, तुम्हाला प्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि तेथून प्रायव्हसी फीचर्सवर टॅप करावे लागेल. आता येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, तुम्हाला Hide apps वर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. तुम्ही आधीच पासवर्ड सेट केला नसेल, तर नवीन पासवर्ड टाकून तो सक्षम करा.

Hide Apps पर्याय इनेबल करताच, तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर सर्व विद्यमान मोबाइल अॅप्सची यादी उघडेल. या सूचीमधून तुम्हाला लपवायचे असलेले कोणतेही अॅप निवडा आणि प्रवेश कोड एंटर करून सुरक्षा प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर अॅप हाईड होईल. तुम्ही अॅप सूचीमध्येही अॅप पाहू शकणार नाही. तुम्हाला Hidden App पाहायचे असेल तर तुम्हाला फोनमधील ऍक्सेस कोड डायल करावा लागेल आणि कॉलसह ऑप्शनवर टॅप करावे लागेल. असे केल्याने, तुम्हाला सर्व लपविलेले अॅप्स दिसतील.

वाचा: Samsung चा पॉप्युलर स्मार्टफोन झाला स्वस्त, फोनमध्ये 12GB RAM सह 50MP कॅमेरा

Source link

Leave a Reply