Headlines

‘या’ शॉर्टकट Keys च्या मदतीने मिनिटात होईल लॅपटॉपवरील काम, स्क्रीनशॉटही काढू शकता; पाहा डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्ली: Laptop Shortcut Keys: कॉलेज, जॉब, बिझनेससह अनेक कामांसाठी लॅपटॉप गरजेचा झाला आहे. स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मात्र, लॅपटॉपवर काम करताना एकाच प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तासंतास लागतात. जर तुम्हाला काही शॉर्टकट माहिती असल्यास तुमचे काम अगदी काही मिनिटात पूर्ण होऊ शकते. लॅपटॉपवर काम करताना शॉर्टकट Keys माहित असल्यास तुमचे काम लवकर होईल. वेळेची देखील बचत होईल. तुम्हाला कदाचित या शॉर्टकट Keys बद्दल माहिती असण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही जर लॅपटॉपवर काम करत असाल तर या शॉर्टकट कीज नक्कीच जाणून घ्या.

वाचा: एकच नंबर! LG ते Samsung… बंपर डिस्काउंटसह मिळतायत मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही, पाहा लिस्ट

Window + alt + R

Window + alt + R या शॉर्टकट Key बद्दल तुम्हाला माहिती असण्याची शक्यता आहे. या शॉर्टकट की ला एकाचवेळी प्रेस केल्यास लॅपटॉपचे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होते. स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी Window + Alt + R बटन एकाचवेळी दाबा. तुम्हाला जर लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करायची असल्यास हा शॉर्टकट उपयोगी येईल.

Window + L

ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरला बंद न करता कोठे बाहेर जायचे असल्यास या शॉर्टकटचा वापर करू शकता. Window + L चा वापर करून तुम्ही लॅपटॉपला लॉक करू शकता. लॅपटॉपला बंद न करता बाहेर जायचे असल्यास याचा फायदा होईल.

वाचा: iPhone खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहे ‘हे’ मॉडेल

Alt + Print

तुम्हाला जर लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर स्क्रीन शॉट काढायचा असल्यास या शॉर्टकट Key चा वापर करू शकता. Alt + Print शॉर्टकट Key एकाचवेळी दाबून तुम्ही स्क्रीन शॉट काढू शकता.

Window + M

लॅपटॉपवर आपण अनेक विंडो ओपन करत असतो. या सर्व विंडोला एकाचवेळी मिनीमाइज करायचे असल्यास Window + M शॉर्टकट Key वापरू शकता. या शॉर्टकट Key मुळे लॅपटॉपवर ओपन असलेल्या सर्व विंडो एकाचवेळी मिनीमाइज होतील.

वाचा: Friendship Day ला तुमच्या मित्र-मैत्रिणींना गिफ्ट द्या ‘हे’ शानदार इयरबड्स, किंमत कमी-फीचर्स जबरदस्त

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *