Headlines

‘या’ फोटोमध्ये एक इंग्रजी शब्द लपलाय… पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

[ad_1]

मुंबई : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपलं मनोरंजन होते. येथे अनेक मजेदार व्हिडीओ मिळतात. एवढेच काय तर आपल्याला सोशल मीडियावर अनेक गोष्टींची माहिती मिळते. तर यावर आपल्याला कधीकधी अशा गोष्टी अशा पाहायला मिळतात. ज्या आपल्याला चक्रावून टाकतात. सध्या सोशल मीडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे. जो ऑप्टिकल इल्युजनचा फोटो आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत असल्याचा भास होईल. हा फोटो सोशल मीडियावर सर्वजण आपल्या मित्रांसोबत शेअर करुन त्यांच्या तीक्ष्ण नजरेची परीक्षा घेत आहेत. परंतु फार कमी लोकांना याचं उत्तर येत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक चेहरा दिसत आहे, पण त्यात काहीतरी लिहिले आहे, परंतु ते सांगण्यासाठी भल्याभल्यांना घाम फुटला आहे.

Donut_Playz_7573 नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडिया साइट Reddit वर लोकांसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर चष्मा लावलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसेल.

या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फक्त समोरचा भाग तुम्हाला दिसेल. या फोटोत तुम्हाला नाक, तोंड, गळा आणि डोळ्यांना चष्मा घातलेला दिसतो. पण या चित्रात आणखी काही दडलेले आहे. ते म्हणजे एक इंग्रजी वाक्य.

परंतु त्यामध्ये लिहिलेला शब्द नक्की कोणता आहे. हे फारच कमी लोकं ओळखू शकले आहेत. तुम्हाला देखील याबाबत जाणून घ्यायचं असेल तर, आज आम्ही ते ओळखण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहोत.

हा फोटो डावीकडून पाहा, तुम्हाला Liar हा इंग्रजी शब्द वाचायला मिळेल. आता पुढील गोष्टींना लक्षात ठेवा आणि तसे त्या फोटोकडे पाहा.

चष्मा असलेले डोळे आणि नाक L अक्षराप्रमाणे बनवलेले असतात, तर नाकातील छिद्र आणि त्याच्या पुढच्या भागावर I अक्षर असते. त्याच वेळी, दोन्ही ओठ मिळून A (A) बनत आहेत, तर हनुवटीपासून गळ्यापर्यंतचा भाग R (R) सारखा दिसत आहे. हा फोटो किंवा त्यामधील चित्र जितकं साधं दिसतंय तितकं ते खरं नाही.

ही ऑप्टिकल इल्युजन पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच.लोकांनीही वेगाने प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हा फोटो पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, या फोटोत असा देखील शब्द लपला आहे असे मला, वाटले देखील नव्हते. त्याच वेळी, आणखी एका वापरकर्त्याने सांगितले की, हे चित्र खरोखर कोणाच्याही डोळ्यांना फसवू शकते. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही हा फोटो शेअर केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *