‘या’ एकमेव कारणामुळे लवकर खराब होतात स्मार्टफोनचे ओरिजनल चार्जर


नवी दिल्लीः नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्यासोबत ओरिजनल चार्जर मिळते खरे, परंतु, ते लवकर खराब झाल्याचा अनेकांना अनुभव आहे. स्मार्टफोनचा वापर करताना अनेकांचे चार्जर हे लवकर खराब होते. त्यामुळे स्मार्टफोन सोबत मिळालेले कंपनीचे चार्जर खराब झाल्याने मार्केटमधून काही महिन्याच्या आत डुप्लिकेट चार्जर खरेदी करावे लागते. एक तर पैसे जातात आणि चार्जर सुद्धा ओरिजनल मिळत नाही. त्यामुळे डुप्लिकेट चार्जरमुळे महागडा स्मार्टफोन सुद्धा खराब होतात. हे सर्व टाळायचे असेल तर खूपच सोपी पद्धत आहे. तुम्ही जर या समस्येने त्रस्त असाल तर त्यासाठी एकच काम करा. स्मार्टफोनला चार्जिंग करताना थोडे हळू आणि व्यवस्थित चार्जरची पिन मोबाइलमध्ये लावा. जेनेकरून तुमच्या स्मार्टफोनचे चार्जर खराब होणार नाही.

तसेच जर स्मार्टफोनचे ओरिजल चार्जर वारंवार तुम्ही कोणाला तरी चार्जिंगसाठी देत असाल तर समोरचा व्यक्ती तुम्ही दिलेले चार्जर कशा पद्धतीने वापरतो हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे तो ते चार्जर कसे वापरतो, यामुळे तुमचे चार्जर खऱाब होऊ शकते. कारण, प्रत्येकाचा स्मार्टफोन थोडा वेगळा असतो. स्मार्टफोन वेगळ्या कंपनीचा आणि वेगळ्या इंचाचा असतो. त्यामुळे स्मार्टफोनच्या चार्जरला नुकसान होऊ शकते. जर या दोन गोष्टी तुम्ही टाळल्या तर तुमचे चार्जर खराब होणार नाही. आपल्या स्मार्टफोनचे चार्जर स्वतः वापरा. दुसऱ्याला वारंवार देत बसू नका. असे केल्यास तुमचे ओरिजनल चार्जर अनेक महिने चालू शकते.

तसेच, जर कुणी स्मार्टफोनचे चार्जर खूपच वेगाने फोनला लावत असेल तर असे करणे सुद्धा तात्काळ बंद करा. कारण, असे करणे पिनला नुकसान करू शकते. हे काम करणे बंद केल्यास तुमचे चार्जर बरेच महिने व्यवस्थित चालू शकते. तुम्हाला नवीन चार्जर खरेदी करण्याची गरज पडणार नाही. चार्जर खराब होण्याच्या तुम्हाला महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात पहिली म्हणजे आपले चार्जर वारंवार अन्य व्यक्तीला देवू नका. तसेच फोनला चार्जर करताना पिन जोरात आतमध्ये घुसवू नका. या गोष्टी टाळल्यास तुमचे चार्जर अनेक दिवस व्यवस्थित चालू शकेल.

वाचाः WhatsApp चे सर्वात मोठे अपडेट, एकाचवेळी ३२ लोक करू शकणार WhatsApp ग्रुप कॉलिंग

वाचाः WhatsApp Scam: व्हॉट्सअॅपवर आलेल्या ‘या’ मेसेजला चुकूनही रिप्लाय करू नका

वाचाः उन्हाळी सुट्टीत गावाला जायचंय?, असं बुक करा रेल्वेचं कन्फर्म तिकिट, एजंटला पैसे द्यायची गरजच नाही

वाचा: अवघ्या १९ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, मिळेल हाय-स्पीड डेटाचा फायदा; पाहा डिटेल्स

वाचा: ‘या’ शानदार स्मार्ट टीव्हीला खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, किंमत फक्त ८,९९९ रुपये; फीचर्स जबरदस्त

Source link

Leave a Reply