या सुंदर अभिनेत्रीला टीम इंडियामधील हा क्रिकेटर करतोय डेट?


मुंबई : अभिनय क्षेत्रातील लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना फारच इट्रेस्ट असतो. कोणती अभिनेत्री किंवा अभिनेता कोणत्या व्यक्तीला डेट करतोय याबद्दल अनेक चर्चा होत असते. यात क्रिकेटर्स देखील मागे नाहीत. अभिनय क्षेत्र आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या क्रिकेटर्ससोबत अफेअर्सच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. त्यात काही अशी देखील जोडपी आहेत, ज्यांनी एकमेकांसोबत लग्न केलं आहे. त्यात अनुष्का-विराट तसेच जहीर खान- सागरिका घाटगे ही जोडी सर्वांनाच माहित आहे.

त्यात आता आणखी एका क्रिकेटरचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad).

क्रिकेटर ऋतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad) आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) दोघ एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा आहेत. मात्र याबाबात क्रिकेटरला विचारले असता, त्याने ही गोष्ट मान्य केली नाही.

कोण आहे सायली संजीव? आणि ती काय करते असा प्रश्व अनेकांना पडला असावा, तर आज आम्ही तुम्हाला सायलीबद्दल काही माहिती सांगणार आहोत.

सायली संजीवने झी मराठी  ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली आणि लोकांच्या घराघरात पोहोचली, यामधील सायलीचे गौरी हे व्यक्तीमत्व लोकांना फार आवडते. ज्यामुळे तिला ‘फ्रेश फेसचा’ अवॉर्ड देखील देण्यात आला.

सायली संजीव एका म्युझिक व्हिडीओमुळे टीव्हीवर आली ज्यामध्ये सुशांत शेलार तिच्यासोबत होता, तिचा 9x झकास टॉप कॉन्टेस्टच्या टॉप-10 सर्वोत्कृष्ट नायिकांमध्ये समावेश करण्यात आला.

सायली संजीवने नाशिकच्या एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजमधून बीए पॉलिटिक्सची पदवी घेतली आहे. तिला कॉलेजकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

तिने स्वारोवस्की जेम्स, डेंटझ, क्विकर आणि बिर्ला आयकेअरसाठी मॉडेलिंग देखील केलं आहे.+

मॉडेलिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर, सायली संजीवने राजू पार्सेकर यांच्या ‘पोलीस लाइन्स – एक पूर्ण सत्य’ या चित्रपटासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अँड सीडी आणि द स्टोरी ऑफ पैठणी सारखे चित्रपटही तिने केले आहे.

सायली संजीवला छोट्या पडद्यावर ‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ यांसारख्या शोमधून खूप यश मिळाले. अलीकडेच तिने ‘शुभमंगल ऑनलाइन’ या टीव्ही मालिकेतही काम केलं आहे.

सायली संजीवचा जन्म 1993 मध्ये झाला, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.Source link

Leave a Reply