Headlines

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून ऑपरेशन परिवर्तनला सुरुवात

सोलापूर – सोलापूर जिल्ह्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरून हातभट्टी निर्मिती होत आहे. त्याची विक्री देखील होते. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणाला मुकावे लागते. यासाठी सोलापूर ग्रामीण मध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीण मध्ये हातभट्टी विक्री व निर्मिती करणारे एकूण 71 ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित केलेली 71 ठिकाणे पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक म्हणून देण्यात आले आहे. दत्तक गावातील अवैध दारूबंदी , निर्मिती व विक्री बंद करणे , दारू विक्री व निर्मितीच्या व्यवसायातील लोकांना परावृत्त करणे , दुसऱ्या कायदेशीर उद्योगाकडे वळवणे. त्यासाठी शासकीय मदत किंवा कर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी पालक अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अनुक्रमे मुळेगाव तांडा व भानुदास तांडा तालुका दक्षिण सोलापूर हे दोन तांडे दत्तक घेतले आहेत. जुनी अधिकाऱ्यांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक घेऊन दोन्ही तांड्यावरील अवैध दारु निर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापेमारी केली.

या छापेमारी मध्ये एकूण दहा लाख पंधरा हजार 950 रुपये किमतीचे 150 लिटर दारू (३७५० रूपये) व 48 हजार 200 लिटर रसायन जप्त करण्यात आले.

मुळेगाव भानुदास तांडा येथील कारवाई मध्ये मा. तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक , मा. अतुल झेंडे अप्पर पोलीस अधीक्षक , सर्जेराव पाटील , अरुण फुगे , पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस स्टेशन , श्री काजुळकर , राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *