Headlines

मिसकॅरेजच्या दुसऱ्याच दिवशी निर्मात्यांनी Smriti Irani यांना शूटिंगवर बोलावलं होतं! एकता कपूरला द्यावा लागला होता पुरावा

[ad_1]

Smriti Irani On Miscarriage : केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या आज अनेक महिलांसाठी आदर्श आहेत. स्मृती इराणी यांनी घराची परिस्थिती नीट नसल्यानं मॅकडोनाल्डमध्ये वेटरचं काम करत होत्या. त्यानंतर त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला स्मृती इराणी यांनी मॉडेलिंग केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, स्मृती यांना खरी ओळख ही ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मिळाली. स्मृती यांच्यासोबत या मालिकेच्या सेटवर खूप भयानक घटना झाली होती. खरंतर स्मृती यांना त्यांचा गर्भपात झाल्याच्या एक दिवसानंतर सेटवर बोलावण्यात आले होते. इतकंच काय तर स्मृती इराणी यांना मालिकेची निर्माता एकता कपूरला मेडिकल पेपर देखील दाखवण्याची आवश्यकता भासली, कारण तिच्या सह कलाकारांनी एकताला सांगितले की स्मृती खोटं बोलत आहे. 

स्मृती इराणी यांनी नुकतीच नीलेश मिश्राला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. स्मृती यांनी सांगितलं की एक अशी वेळ होती जेव्हा त्या ‘रामायण’साठी (Ramayan) सकाळच्या शिफ्टला काम करायच्या आणि रात्रीच्या शिफ्टला ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या मालिकेसाठी. याच दरम्यान, त्या प्रेग्नंट झाल्या. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मला माहित नव्हतं मी प्रेग्नंट आहे. त्यावेळी मी मालिकेच्या सेटवरच होते. मी निर्मात्यांना सांगितलं की मला ठीक वाटत नाही आहे, कृपया मला घरी जाऊ द्या. तरी सुद्धा त्यांनी मला जोपर्यंत जा म्हटलं नाही तो पर्यंत मी काम केलं. जेव्हा मी निघाले तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. अर्ध्या रस्त्यात मला ब्लीडिंग सुरु झाली. त्यावेळी पाऊस सुरु होता आणि मी ऑटोवाल्याला सांगितलं की मला लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवा.’ 

पुढे स्मृती म्हणाल्या, ‘जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा समोरून एक नर्स धावत आली आणि तिनं माझ्याकडे ऑटोग्राफ मागितला. मी तिला म्हटलं की मला अॅडमिट करणार का मला असं वाटतंय की माझा गर्भपात (मिसकॅरेज) झालं आहे. त्याच्या एक दिवसानंतर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ च्या प्रोडक्शन टीमचा फोन आला आणि दुसऱ्या दिवशी शूटिंगला येण्यास सांगितले. त्यावेळी मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं मिस्कॅरेज झालं आहे आणि मला ठीक वाटतं नाही आहे. समोरून उत्तर आलं काही नाही 2 च्या शिफ्टला ये.’ 

रवि चोप्रायांनी घेतलं समजून

स्मृती पुढे म्हणाल्या, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत माझ्या व्यतिरिक्त आणखी 50 कलाकार होते, पण रामायणमध्ये माझी सीताची भूमिका होते त्यामुळे त्यांचं मी एकवेळ समजू शकते. पण त्यावेळी रवि चोप्रा यांना मी विनंती केली आणि म्हणाले की 7 च्या शिफ्टला एक तास उशिरा येऊ शकते का?  त्यावर रवि म्हणाले, तू पागल आहेस का? तुला माहितीये का एक बाळ गमावण्याचं दु: ख काय असतं. उद्या येण्याची काही गरज नाही.’

हेही वाच : ‘माय बोम्मा…, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र

स्मृती यांना एकताला मेडिकल पेपर दाखवण्यावर सांगितले की, ‘मी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या सेटवर गेल्यावर कळले की एका सहकलाकारानं मिसकॅरेजविषयी मी खोटं बोलत असल्याचं सांगितलं. मी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सेटवर पोहोचली होती. कारण माझ्यावर घराचं लोन होतं आणि मला ईएमआय भरण्यासाठी पैशांची गरज होती. जेव्हा मला संपूर्ण प्रकरण कळलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एकताजवळ सगळे मेडिकल पेपर्स घेऊन गेले होते. पेपर्स पाहताच एकताला काय करावं कळलंच नाही आणि ती म्हणाली की पेपर्स दाखवू नकोस. मी म्हटले बाळ नाही, नाही तर तेही दाखवलं असतं.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *