Headlines

OMG!आवडते Photos-Videos फोनमधून डिलीट झाले ? असे करा रिकव्हर, मिनिटांत होईल काम

[ad_1]

नवी दिल्ली: Deleted Photos-Videos: फोटो आणि व्हिडिओ हे चांगल्या आणि वाईट सगळ्याच आठवणी साठवून ठेवतात. आजकाल तर, प्रत्येक जण फोटोसाठी फोनचाच वापर करतो. फोनच्या गॅलरीत सुद्धा खूप फोटोज असतात. पण, कधी-कधी चुकून हे फोटो किंवा व्हिडिओ डिलीट झाले तर, मात्र चांगलेच टेन्शन येते. त्यावेळी काय करावे हे काळत नाही. पण, काळजी करू नका. कारण, तुम्ही ते फोटोज पुन्हा रिकव्हर करू शकता. स्मार्टफोन आणि टेक कंपन्या असे फोटो रिकव्हर करण्याचा पर्याय देतात. त्याबद्दल जाणून घेऊया.

वाचा: Vodafone-Idea Plans: बेस्टच ! एकाच बिलात संपूर्ण कुटुंबाला मिळणार अनलिमिटेड कॉल, डेटासह हे बेनेफिट्स

Google Photos हा एक पर्याय आहे:

तुम्ही Google Apps वापरत असल्यास तुमचे फोटो आणि व्हिडिओ फोनवरून हटवल्यानंतरही त्यांचा बॅकअप घेतला जातो. तुम्ही हे फोटो परत मिळवू शकता. प्रत्येक Google Account मध्ये १५ GB स्टोरेज उपलब्ध आहे. ही जागा Google Drive, Gmail आणि Google Photos मध्ये शेअर केली आहे. हे स्टोरेज संपल्यावर, तुम्ही ते Google One वर अपग्रेड करू शकता. त्यानंतर तुमचे स्टोरेज १०० GB किंवा त्याहून अधिक वाढते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योजना मिळतात, ज्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.

वाचा: मस्तच ! OnePlus Buds Pro ३९९१ रुपयांच्या ऑफसह मिळविण्याची संधी, डिव्हाइसची MRP ९९९० रुपये

iPhone युजर्ससारठी Apple iCloud:

तुम्ही Apple यूजर असाल तर तुम्ही iCloud देखील वापरू शकता. तुम्ही iCloud साठी साइन अप करता तेव्हा, तुम्हाला 5GB मोफत स्टोरेज दिले जाते. यानंतरही, तुम्हाला जागेची आवश्यकता असल्यास, तुम्ही iCloud+ वर अपग्रेड करू शकता. iCloud स्टोरेजचे प्रीमियम वैशिष्ट्य आहे

ट्रॅश किंवा Bin :

काही स्मार्टफोन कंपन्या तुम्हाला ट्रॅश किंवा बिनचा पर्याय देतात. जेव्हा तुम्ही फोटो आणि व्हिडिओ हटवता, तेव्हा ते या मोफत स्टोरेजमध्ये काही काळासाठी सेव्ह केले जातात, जे तुम्ही रिकव्हर करू शकता. याशिवाय, तुम्ही मायक्रोएसडी कार्ड वापरून तुमचे फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर करू शकता आणि गरज पडेल तेव्हा वापरू शकता.

वाचा: Cyber Fraud: तुम्हालाही हे 5 SMS येत असतील तर, राहा अलर्ट ! एक क्लिक आणि अकाउंट रिकामे

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *