Headlines

विधानसभा इतर कामकाज

[ad_1]

मुंबई, दि. 23 : सावित्रीबाई फुले रूग्णालयातील वातानुकूलित यंत्र बिघाडानंतर झालेल्या अपघातामुळे आजतागायत चार बालके मृत्युमुखी पडली आहेत. या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्यात येत असून, यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसृतीगृहामधील वातानुकूलित यंत्र बिघाडामुळे झालेल्या अपघातातबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यामध्ये सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

या स्थगन प्रस्तावास उत्तर देताना नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, बालकांचा मृत्यू होणे ही घटना अतिशय संवेदनशिल असून दुर्देवी आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

००००

विधिमंडळ सदस्यांना दिलेल्या धमकीबाबत एसआयटीद्वारे चौकशी करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वंकष धोरण तयार करणार

मुंबई, दि. 23 : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना समाजमाध्यमाद्वारे आलेल्या धमकीच्या घटनेवर कारवाई करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात विधिमंडळ सदस्य अथवा सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन अशा घटनांना आळा बसण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनिल प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सॲपद्वारे धमकी आल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. विधानसभा सदस्यांना अनेकदा अशा धमक्या देण्यात येतात यावर कडक कारवाई होऊन भविष्यात अशा घटना घडू नये याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकातील बंगलोर येथील जयसिंग राजपूत या आरोपीने धमकी दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आयुष्य महत्त्वाचे असून, या घटनेची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत  सहभाग घेतला.

0000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *